कार्तिक वारीत होणार "संतपीठ' संकल्पचित्राचे अनावरण

varkari
varkari

आळंदी (पुणे) : आळंदी देवस्थानच्या मालकीच्या साडेचारशे एकर जागेत सुमारे शंभर कोटीहून अधिक रकमेची माउली सृष्टी नावाने संतपीठ या प्रकल्पाच्या संकल्पचित्राचे अनावरण सोहळा कार्तिकी वारीत करणार असल्याचे आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे यांनी सांगितले. 

ऍड. ढगे म्हणाले, की आळंदी देवस्थानच्या मालकीचे चारशे पासष्ट एकर जागा आहे. टेकडीवजा जागा असल्याने आणि भौगोलिक रचना नीट नसल्याने देवस्थानला विकास करण्यासाठी ही जागा अडचणीची होती. मात्र वारक-यांची गरज आणि पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी देवस्थानने संकल्प केला आहे. या ठिकाणी वारकरी आणि स्थानिक वारकरी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून जागांचा विकास केला जाणार आहे. त्याचप्रमाणे आषाढी आणि कार्तिकी वारीत लाखोंच्या संख्येने वारकरी आळंदीत येतात. या वेळी आळंदी गावठाणातील जागा वारकऱ्यांना मुक्कामासाठी कमी पडू लागल्याने शहराबाहेर दिंडीकऱ्यांच्या मुक्कामाची सोय चांगल्या तऱ्हेने करून देण्यासाठी जागेचा विकास केला जाणार आहे. म्हणून माउलीसृष्टी नावाने देवस्थान संतपीठ उभारणार आहे. पहिल्या टप्प्यात शंभर कोटीची कामे केली जातील. 

दुसऱ्या टप्प्यात रुग्णालय आणि तिस-या टप्प्यात वारकरी शिक्षण देणारे आणि नियमित महाविद्यालये आर्थिक दुर्बल घटकांना सामोरे ठेवून उभारले जाईल. पूर्णपणे भाविकांच्या देणगीतून प्रकल्प उभारला जाणार आहे. यामुळे देणगीदारांनी देवस्थानच्या कार्यालयाशी संपर्क साधून देणगी देण्याचे आवाहन ढगे यांनी या वेळी केले. 
 
संतपीठ प्रकल्प (पहिला टप्पा) 
- वारकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा 
- सुसज्ज भक्तनिवास, 
- गार्डन 
- वृक्षलागवड 
- शाळा 
- वारकरी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com