esakal | पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची कचरा व्यवस्थापन प्रकल्पांच्या जागेची चिंता मिटली
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit-Pawar

पुणे जिल्ह्यातील गावां-गावातील घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी प्रकल्प उभारण्यासाठी  मुबलक निधी उपलब्ध झाला. पण अनेक गावांना या प्रकल्पासाठी जागाच नव्हती. यावर आता पालकमंत्री अजित पवार यांनी तोडगा काढला आहे. यानुसार या प्रकल्पांसाठी ग्रामपंचायतींना आता गायरान जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे.

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची कचरा व्यवस्थापन प्रकल्पांच्या जागेची चिंता मिटली

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - जिल्ह्यातील गावां-गावातील घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी प्रकल्प उभारण्यासाठी  मुबलक निधी उपलब्ध झाला. पण अनेक गावांना या प्रकल्पासाठी जागाच नव्हती. यावर आता पालकमंत्री अजित पवार यांनी तोडगा काढला आहे. यानुसार या प्रकल्पांसाठी ग्रामपंचायतींना आता गायरान जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना तसा आदेश दिला आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रकल्प मार्गी लागू शकणार असल्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी सांगितले. 

पत्रकारांच्या विमा संरक्षणाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी दिले संकेत; अधिवेशनात मांडणार मुद्दा

केंद्र सरकारने पंधराव्या वित्त आयोगाचा बंधित निधीचा (टाईड ग्रॅंट) सुमारे ८५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता उपलब्ध करून दिला आहे. यापैकी सर्व ग्रामपंचायतींना मिळून ६८ कोटी ४१ लाख ३३ हजार रुपयांचा निधी वितरित नुकताच करण्यात आला आहे. यापैकी निम्मा निधी हा स्वच्छता व पिण्याचे पाणी या बाबींवर खर्च करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

मास्क न घालणाऱ्या बहाद्दरांनो, आता पोलिस तुम्हाला लस टोचणार पण दंडाची!

राज्यात १ एप्रिल २०२० पासून पंधराव्या वित्त आयोगाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. मात्र २९ जूनपर्यंत  यासाठी जिल्हा परिषदेला कवडीचाही निधी उपलब्ध झाला नव्हता. २९ जूनला बेसिक ग्रॅंटचा पहिला हप्ता तर आता २ आॅगष्टला बंधित निधीचा  पहिला हप्ता प्राप्त झाला होता. 

मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण देणारे दोन ध्येयवेडे शिक्षक...

ग्रामपंचायतींना तालुकानिहाय वाटप निधी (रुपयांत) 
- आंबेगाव --- ४ कोटी ४९ लाख ३८ हजार १४०.
- बारामती ---- ६ कोटी ६ लाख ७४ हजार ४५२.
- भोर --- ३ कोटी २५ लाख ४४ हजार ९७१.
- दौंड --- ६ कोटी १९ लाख ६८ हजार २२.
- हवेली --- ७ कोटी ९२ लाख, ७० हजार २३१.
- इंदापूर ---- ७ कोटी २ लाख ६ हजार २६८.
- जुन्नर --- ७ कोटी ७ लाख ६४ हजार ४२७.
- खेड --- ६ कोटी ७६ लाख ८० हजार ९८५.
- मावळ ---- ४ कोटी ७३ लाख ५९ हजार २२१.
- मुळशी ---- ३ कोटी २६ लाख ४५ हजार ९०६.
- पुरंदर --- ३ कोटी ७५ लाख ८९ हजार ६००.
- शिरूर ---- ६ कोटी ६८ लाख ५६ हजार ८५८.
- वेल्हे --- १ कोटी १६ लाख ३३ हजार ९१९.

Edited By - Prashant Patil