गंगानगर ते मराठी शाळा रस्ताचे काँक्रिटिकरण सुरू

रमेश मोरे
गुरुवार, 24 मे 2018

जुनी सांगवी येथील गंगानगर ते मराठी प्राथमिक शाळा रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रिटीकरण कामास विद्यमान नगरसेवक व नागरीकांच्या हस्ते नारळ फोडुन सुरूवात करण्यात आली.

सांगवी (पुणे)  :  जुनी सांगवी येथील गंगानगर ते मराठी प्राथमिक शाळा रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रिटीकरण कामास विद्यमान नगरसेवक व नागरीकांच्या हस्ते नारळ फोडुन सुरूवात करण्यात आली. गेली अनेक वर्षापासुन दुर्लक्षित असलेल्या या अंतर्गत रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटिकरण होत असल्याने येथील शाळकरी मुले, जवळच असलेली खाजगी हॉस्पीटल्स व नागरीकांना रहदारीसाठी सोयीचा ठरणार आहे.

नगरसेवक संतोष कांबळे यांच्या हस्ते कामाची सुरूवात करण्यात आली. यावेळी हर्षल ढोरे, हिरेन सोनवणे, जवाहर ढोरे, स्थापत्य कनिष्ठ अभियंता सचिन सानप, तांत्रिक सल्लागार प्रशांत धोंडे, दत्ता येणपुरे, मोहित लोंढे, ओंकार पोंगडे, श्रीराज काकडे आदी उपस्थित होते.

Web Title: concretization of road in sangvi