ग्रेडसेपरेटरमधील काँक्रिटच्या रस्त्याला तडे

कासारवाडी - मार्शल कंपनीसमोरील ग्रेड सेपरेटरला गेलेले तडे.
कासारवाडी - मार्शल कंपनीसमोरील ग्रेड सेपरेटरला गेलेले तडे.

पिंपरी - काँक्रिट रस्ता जास्त काळ टिकतो, असे म्हणतात. मात्र, कासारवाडी ते एम्पायर इस्टेटकडे जाणाऱ्या ग्रेडसेपरेटरमधील काँक्रिटच्या रस्त्याला तडे जाण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे अपघाताची शक्‍यता आहे. 

ग्रेडसेपरेटरमधील कासारवाडी ते खराळवाडीदरम्यानच्या रस्त्यावर मेट्रोचे खांब उभारणीचे काम सुरू आहे. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या काँक्रिटला तडे गेल्याने दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. अनेक भागांतील काँक्रिट उखडून गेल्यामुळे रस्त्याचा समतोल बिघडला आहे. 

मेट्रोच्या कामामुळे जड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते. मेट्रोचे काम बंद असते त्या वेळी हा रस्ता वाहतुकीस खुला असतो. ग्रेडसेपरेटरमधील रस्ता खराब झाल्याचा फटका वाहनांना बसत आहे.  ग्रेडसेपरेटरमधील वाहतूक २००८ मध्ये सुरू झाली. अवघ्या दहा वर्षांत त्याला तडे गेले आहेत. रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर प्रत्येक दोन ते तीन वर्षांनी महापालिकेने त्याची देखभाल करणे अपेक्षित होते. तसेच ज्या भागात तडे गेले तेथे दुरुस्ती होणे गरजेचे आहे. 

चिंचवड येथील नागरिक संदीप राऊत म्हणाले, ‘‘ग्रेडसेपरेटरमधला रस्त्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले. ग्रेडसेपरेटरचे काम करताना कच्चा माल हलक्‍या दर्जाचा होता का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. काँक्रिटचे रस्ते खूप दिवस टिकतात. मात्र, हा रस्ता इतक्‍या लवकर कसा खराब झाला. पावसाळ्यात या रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी तो वाहतुकीसाठी बंद ठेवावा.

सिमेंट रस्ता १२ वर्षांपूर्वीचा आहे. सध्या मेट्रोचे काम सुरू आहे. सिमेंट पिलरच्या कामासाठी जड मशिन वापरण्यात येत असल्याने ती हलविताना रस्त्याला तडे जातात. त्यामुळे काही ठिकाणी रस्ता उखडला आहे. मात्र, मेट्रोने रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी उचलली आहे. तूर्तास तडे गेलेल्या ठिकाणांची दुरुस्ती करणार आहोत. अपघात होऊ नये याची दक्षता घेत आहोत.
- विजय भोजने, प्रवक्ता, बीआरटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com