देशातील काही विद्यापीठांमधील स्थिती काळजीची

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

उद्योग क्षेत्रात होणारे बदल लक्षात घेऊन आपल्या रोजगाराच्या संधी कशात आहेत, हे ओळखून शिक्षण घेतले पाहिजे.
- डॉ. भूषण पटवर्धन, उपाध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग

पुणे - ‘देशातील काही विद्यापीठांमधील स्थिती काळजी वाटावी अशी आहे, ही शैक्षणिक संकुले राजकीय आणि वैचारिक संघर्षाची युद्धभूमी नाही. विद्यार्थ्यांनी राजकारण्यांचे बाहुले न बनता ज्ञान घेऊन आपले भविष्य घडवावे,’’ असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विश्‍वकर्मा विद्यापीठाच्या पहिल्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. या वेळी ‘एमसीसीआयए’चे अध्यक्ष प्रदीप भार्गवा, विद्यापीठाचे अध्यक्ष भरत अग्रवाल, कुलगुरू डॉ. सिद्धार्थ जबडे, विश्‍वस्त राजकुमार अगरवाल, अस्मिता अगरवाल उपस्थित होते. 
डॉ. पटवर्धन म्हणाले, ‘‘देशातील काही नामांकित विद्यापीठांमधील परिस्थिती बघून काळजी वाटते. या संस्था ज्ञान, शिष्यवृत्ती आणि गुणवत्ता प्राप्त करण्याची मंदिरे आहेत. विचारसरणी किंवा राजकीय पक्षांच्या स्वार्थासाठी विद्यापीठांना युद्धभूमी बनवण्याची गरज नाही. 

पिंपरीत आलिशान मोटारीसाठी मित्राचाच खून

शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळून त्यांच्या जीवनाला आकार प्राप्त होतो. मानवी मूल्य रुजून भेदभाव कमी झाला पाहिजे. ज्ञानाचा उपयोग पर्यावरण आणि शांततेसाठी झाला पाहिजे. युवकांनी राजकारण्यांचे समर्थक न होता उच्चशिक्षण घेण्याकडे लक्ष द्यावे. 

आपली शैक्षणिक संकुले असामाजिक तत्त्वांपासून कशी सुरक्षित राहतील, याकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The condition of care in some universities in the country