सांगा, पिसोळी-मंतरवाडी रस्त्यावरून कसं जायचं? (व्हिडिओ)

सांगा, पिसोळी-मंतरवाडी रस्त्यावरून कसं जायचं? (व्हिडिओ)

पुणे : शहरालगतच्या वेगाने विकसित होत असलेल्या पिसोळी येथील धर्मावत पेट्रोल पंपापासून उंड्री, हंडेवाडी आणि मंतरवाडीपर्यंतचा रस्ता वाहनचालक आणि नागरिकांसाठी जीवघेणा बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या महामार्गाचे काम रखडले आहे. या महामार्गाचे एका बाजूचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे. अन्यथा याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी पाठवा, अशी मागणी वाहनचालक आणि रहिवाशांकडून केली जात आहे.

कोंढव्यातील खडीमशिन चौक आणि त्यापुढे पिसोळी, उंड्री, हंडेवाडी, मंतरवाडी, उरळी देवाची या भागात नागरिकांचे वास्तव्य वाढले आहे. या महामार्गावर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असते. शहरालगतच्या या भागात लोकसंख्या वाढली. परंतु या भागात रस्त्यांची दुरवस्था आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने खडीमशिन चौक ते पिसोळीपर्यंत सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण केले. परंतु या महामार्गाच्या लगतच्या सेवा रस्त्याचे काम अद्याप झालेले नाही.

रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक उभारण्यात आलेले नाहीत. रात्री रस्त्यावर विजेचे दिवे नाहीत. त्यामुळे हा महामार्ग धोकादायक बनला आहे. या भागात येणाऱ्या नागरिकांना या महामार्गावरून वाहन चालवणे जिकीरीचे बनले आहे. त्यामुळे महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबतही आता प्रश्‍नचिन्ह उभारले आहे.

कात्रजपासून खडीमशिन चौक, पिसोळी, उंड्री, हंडेवाडी या भागात दररोज अपघात होत आहेत. या अपघातांमध्ये वाहनचालकांचा बळी गेला आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या भागातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. पिसोळी येथील धर्मावत पेट्रोल पंपाजवळ समोरील रस्त्यावर खड्डे मोठ्या प्रमाणावर आहेत. परंतु या महामार्गाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांची अन्यत्र बदली करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

गेल्या साडेतीन वर्षांपासून या महामार्गाचे काम रखडलेले आहे. महामार्गावर दुभाजक नाहीत. रिफ्लेक्‍टर बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. गावात वळण्यासाठी रस्ता दिलेला नाही. या भागातील नागरिकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून हे काम पूर्ण करावे.

- किरण नागवडे, रहिवाशी, पिसोळी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com