पुणे : विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर

Using-Twitter-to-track-Food.jpg
Using-Twitter-to-track-Food.jpg

पुणे : एमआयटीच्या वसतिगृहामध्ये राहणाऱ्या 110 विद्यार्थ्यांना मंगळवारी विषबाधा झाली होती. त्यापैकी 48 जणांना निरक्षणात ठेवले होते. त्यापैकी 40 जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले असून बाकीचे 8 जणांना आज संध्याकाळ पर्यंत सोडण्यात येईल, अशी माहीती विश्‍वराज रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रात नमुद केले आहे. दरम्यान ही माहिती समजाताच अन्न व औषध प्रशासन(एफडीए) विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथील अन्नाचे नमुने घेऊन तपासणीसाठी राज्य अन्न प्रयोगशाळेत पाठिवले आहेत.

लोणी काळभोर येथील विश्‍वशांती गुरूकुल एमआयटी शैक्षणिक संकुलातील एका विभागात शिक्षण घेणारे व एमआयटीच्याच वसतिगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मंगळवारी विषबाधा झाली. ही घटना कळता महाविद्यालयामध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. लोणी काळभोर येथे एमआयटीचे शैक्षिणक संकुल आहे. तसेच एक हजार विद्यार्थ्यांचे वसतीगृहदेखील आहे. या संकुलामध्ये शिपिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या मॅनेट विभाग आहे. या विषबाधा झालेले सर्व विद्यार्थी हे या विभागातील आहेत. वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोयदेखील महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये आहे.

नेहमीप्रमाणे काल (ता.28) दुपारी विद्यार्थी जेवणासाठी गेले. जेवणामध्ये गुलाबजाम देण्यात आले होते. सायंकाळी पाचनंतर अचानक दहा विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होऊ लागला. त्यांना जुलाब आणि उलट्या होऊ लागल्याने त्यांनी कॅम्पसमधील विश्‍वराज रुग्णालयामध्ये जाऊन त्रास होत असल्याची माहिती दिली. त्यांच्यावर उपचार सुरू असताना हळूहळू अशाच त्रास होत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. महाविद्यालयात हा प्रकार कळताच घबराटीचे वातावरण पसरले. उपचारादरम्यान सर्व विद्यार्थ्यांना एकसारखा त्रास होऊ लागल्याने विषबाधेची लक्षण असल्याचे डॉक्‍टरांच्या निदर्शनास आले. त्यांनतर डॉक्‍टारांनी तत्काळ उपचाराला सुरवात केली. सध्या स्थिती नियंत्रणात असून रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com