पुणेकरांनी अनुभवले ढंगबाज बाहुल्यांचे जग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

कोथरूड - बोलक्‍या बाहुल्याने केलेले विनोद, त्याचे हावभाव आणि नृत्य पाहून लहान मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. कलाकारांनी बाहुलीनाट्याचे केलेले वैविध्यपूर्ण सादरीकरण...उपस्थितांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ढंगबाज बाहुल्या... एकाच ठिकाणी अवतरलेली राज्याच्या विविध भागांतील बाहुलीनाट्य कला आणि सजलेले बाहुल्यांचे जग पुणेकरांनी पहिल्यांदाच अनुभवले. 

संवाद पुणेतर्फे पहिले राज्यस्तरीय बाहुलीनाट्य संमेलन आणि प्रदर्शन मंगळवारी आयोजित करण्यात आले. त्याचे उद्‌घाटन ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. व्यंगचित्र काढून त्यांनी संमेलनाला शुभेच्छा दिल्या. या वेळी संस्थेचे सुनील महाजन, बाहुलीनाट्य कलाकार चैत्राली माजगावकर, निनाद पवार, मनीष बोरसे, राहुल संबोधी, दीपाली बाभुळकर उपस्थित होत्या. या संमेलनात राज्याच्या विविध भागातील ३५ बाहुलीनाट्य कलाकारांनी भाग घेतला. 

तेंडुलकर म्हणाले, ‘‘मला व्यंगचित्रातून व्यक्त होता येत नाही. तुम्ही बाहुल्यांच्या माध्यमातून व्यक्त होता, ही मोठी गोष्ट आहे. तंत्रज्ञानाची जोड देऊन या कलेचे मूळ रूप बदलू नका. ते टिकवून ठेवा.’’

बाहुलीनाट्य कलाकार वनराज कुमकर म्हणाले, ‘‘या कलेला पुनरुज्जीवित करण्यासाठी लवकरच त्यावर आधारित बालचित्रपट काढण्यात येणार आहे.’’
‘‘ही कला अधिकाधिक लोकांपर्यंत नेण्यासाठी हे संमेलन घेतले आहे. हे राज्यातील पहिले संमेलन आहे. त्याचबरोबर देशातीलही पहिले असण्याची शक्‍यता आहे,’’ असे माजगावकर यांनी सांगितले.

‘स्वच्छता मोहीम’, ‘कटपुतली नृत्य’, ‘गुड टच बॅड टच’ आदी विषयांवर कलाकारांनी सादरीकरण केले. हातातील बाहुला, स्टीक बाहुला, बोटांद्वारे हाताळण्यात येणारा बाहुला, बोलका बाहुला, रस्त्यावरील बाहुला आदी विविध प्रकारच्या बाहुल्या प्रदर्शनात होत्या. त्यांचे रंगीबेरंगी चेहरे, त्यांचा आकार, लक्षवेधक स्थितीतील त्यांच्या रूपाने कलाप्रेमींचे मन जिंकले.

Web Title: Conference and exhibition of braille