कथाकथना करता आत्मविश्वासही महत्वाचा - डॉ दिलिप गरूड

मिलिंद संधान
मंगळवार, 31 जुलै 2018

नवी सांगवी (पुणे)  - " एकपात्री प्रयोगाशी साम्य सांगणारी कला; कथानिवेदक त्याची देहबोली, आवाजातील आरोह अवरोह व अभिनय शैलीतून व्यक्त करीत असतो. त्यामुळे कथाकथनासाठी कथेची निवड जशी महत्वाची असते तसेच आत्मविश्वासही आवश्यक असतो. " असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक डॉ दिलिप गरूड यांनी दापोडी येथे केले. 

चंद्रकला किशोरीलाल गोयल कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रम प्रसंगी त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी व्यासपिठावर प्राचार्य डॉ विकास पवार, जनता शिक्षण संस्थेचे खजिनदार पोपटराव देवकर उपस्थित होते. यावेळी डॉ गरूड यांनी उपस्थित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कथाकथनाबद्दल माहिती सांगत असताना व्यंकटेश माडगुळकर लिखित ' झेल्या ' या ग्रामिण कथेचे सह अभिनय सादरीकरण केले. 

डॉ गरूड म्हणाले, " कथा म्हणजे गोष्ट आणि कथन म्हणजे सांगणे. त्यामुळे कथाकथन जसे ऐकायचे असते तसे पहायचेही असते. साने गुरूजींनी संस्कारक्षम कथा सांगण्याची परंपरा सुरू केली. त्यामुळे शालेय मुले व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अशा कथा ऐकविल्यास भविष्यातील जबाबदार नागरिक तयार होऊन सामाजिक सलोखा टिकण्यास मदत होईल. "कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुर्यकांत लिमये यांनी केले. प्रास्ताविक डॉ सुभाष सुर्यवंशी यांनी तर आभार बाळासाहेब माशेरे यांनी मानले.

Web Title: Confidence for storytelling - Dr. Drip Garud