पीएम किसान योजनेची माहिती अपलोड करताना होतोय गोंधळ 

पीएम किसान योजनेची माहिती अपलोड करताना होतोय गोंधळ 

जळगाव -  जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान योजनेचे काम वेगात सुरू आहे. या योजनेचे साडेचार लाखांवर लाभार्थी आहेत. त्यापैकी साडेतीन लाखांवर शेतकऱ्यांची माहिती जिल्हा प्रशासनाने अपलोड केली आहे. मात्र, तब्बल साठ हजार शेतकऱ्यांनी राज्यातील इतर ठिकाणचे पत्ते दिल्याने माहिती अपलोड करताना गोंधळ उडाला आहे. या साठ हजार शेतकऱ्यांची नावेच बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

प्रधानमंत्री किसान योजना केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेतील काम अग्रक्रमाने करण्याच्या सूचना आहे. यामुळे सर्वच विभागाचे कर्मचारी या योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती संकलित करून ती अपलोड करण्याचे कामाला अगोदर प्राधान्य देत आहे. 

मात्र, काही शेतकऱ्यांनी चुकीचे पत्ते दिले आहे. शिरसोली (ता. पंढरपूर, जि. जळगाव) यासारखे चुकीचे पत्ते दिले आहेत. काहींनी गाव एक दिले मात्र तालुक्‍याचे नाव दुसरेच दिले. पाळधी गाव जामनेरला आहे अन धरणगाव तालुक्‍यातही आहे. यामुळे माहिती अपलोड करताना अनेक अडचणी येत आहेत. 

अनेक शेतकऱ्यांनी दिलेले नाव व आधारकार्डावर असलेले नाव वेगवेगळी आहेत, काहींचा खाते क्रमांक चुकीचा आहे. काहींनी पत्ते अर्धवट दिले आहे. काहींनी पूर्ण नाव न लिहिता नाव व आडनाव दिल्याने त्याच नावाच्या दोन-तीन व्यक्ती संगणकावर येतात. नेमकी त्यातील कोणती व्यक्ती ती आहे. याचा शोध घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. यामुळे पीएम किसान योजनेच्या कामाला विलंब होत असल्याचे तूर्त चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com