कॉंग्रेसची चाळीस जागांची मागणी - सचिन साठे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

पिंपरी - पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातील आघाडीची बोलणी अंतिम टप्प्यात आहे. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची शनिवारी मुंबईत भेट घेतली व आघाडीबाबतच्या चर्चेची माहिती दिली. त्यांच्या संमतीनंतर आघाडीला सोमवारपर्यंत अंतिम रूप दिले जाईल, असे साठे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

साठे म्हणाले, शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे व आणखी काही पदाधिकाऱ्यांबरोबर आम्ही चर्चा केली. ही चर्चा समाधानकारक झाली. राष्ट्रवादीसमोर 40 जागांचा प्रस्ताव आम्ही दिला. त्यावर उत्तर येणे अपेक्षित आहे. आमच्याबरोबर समविचारी रिपाइं (कवाडे गट), रिपाइं (गवई गट) असे दोन पक्ष आहेत. त्यामुळे 40 जागा आम्हाला मिळायला हव्यात, असा आमचा आग्रह आहे. जागावाटपाचा तिढा सुटला तर उद्या संध्याकाळी (रविवारी) किंवा सोमवारी सकाळी आघाडीची घोषणा होऊ शकते.

दरम्यान, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सांगितले की, आमचे नेते अजित पवार यांनी अगोदर स्थानिक पातळीवर चर्चा करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार कॉंग्रेसबरोबर आघाडीची चर्चा अद्याप सुरू आहे. शुक्रवारची बोलणी समाधानकारक झाली; परंतु कॉंग्रेसची 40 जागांची मागणी मान्य होणे शक्‍य नाही. त्यामुळे चाळीस जागांचा आग्रह कॉंग्रेसने सोडला आहे. एक-दोन दिवसांत पुन्हा चर्चा करून जागावाटपाचा मुद्दा निकालात काढला जाईल. चर्चेचा अहवाल अजित पवार यांना दाखविल्यानंतर निर्णय घेऊन आघाडीला अंतिम रूप दिले जाईल.

Web Title: congress 40 seats demand