पकोडा नोकरी महोत्सव; काँग्रेसचे उपहासात्मक आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

वडगाव शेरी - वाढत्या बेरोजगारीकडे लक्ष वेधण्यासाठी आणि केंद्र शासनाने खोटी आश्वासने देऊन जनतेला एप्रिल फुल केले असा आरोप करीत युवक काँग्रेसने अनोखे आंदोलन केले. त्यांनी कल्याणीनगर येथे पकोडा उद्योग क्षेत्रात नोकरी मिळवून देणाऱ्या नोकरी महोत्सवाचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे आंदोलनावेळी मोदींचे मुखवटे घालून त्यांनी थेट मोदींवरच निशाना साधला.  

यावेळी पुणे शहर युवक काँग्रेसने या आंदोलनाचे आयोजन केले होते. यावेळी माजी शिक्षण मंडळ अध्यक्षा संगीता तिवारी, शहर युवक महासचिव राहुल शिरसाठ, संतोष पाटोळे, वडगाव शेरी मतदारसंघाचे अध्यक्ष विशाल मलके, ब्लाँक अध्यक्षा मिरा शिंदे, बालाजी गाढे, विवेक भरगुडे, नरेश नलावडे, अमोल थोरात, अभिजीत रोकडे, दादाक्षी कामठे, सचिन सुंडके, हर्ष तिवारी, अक्षय राजगुरु, निखिल मोझे, प्रसाद वाघमारे, अक्षय रतनगिरी, रुनेश कांबळे आदी युवक पदाधिकारी उपस्थित होते. 

२०१४ च्या लोकसभा निवडणुक प्रचारावेळी देण्यात आलेल्या आश्वासनापैकी एक म्हणजे वर्षाला दोन कोटी युवकांना  रोजगार देण्याच्या खोट्या आश्वासनाच्या निषेधार्थ हे आंदोनल झाले. कल्याणी नगर येथे भारतीय पकोडा ऊद्योग क्षेत्रात भव्य नोकरी महोत्सव हे ऊपहासात्मक आंदोलन करण्यात आले. जनतेच्या खात्यातील पैसे गुल, एप्रिल फुल, देशातील नोकऱ्या गुल, एप्रिल फुल. नीरव मोदी,ललित मोदी,विजय मल्ल्या विदेशात गुल ,एप्रिल फुल, अशा घोषणा यावेळी देण्यात  आल्या. 

याविषयी शहाराध्यक्ष विकास लांडगे म्हणाले, अमित शाह हे सुक्षिशित तरुणांना पकोडा व्यावसाय करा असा सल्ला सुक्षिशित बेरोजगारांना देतात. लाखो रुपये खर्च करुन पदवी घेतलेल्यांना हा सल्ला म्हणजे शिक्षणाचा अपमान आहे. राहुल शिरसाठ म्हणाले,  या पुढे सरकारच्या नार्कतेपणा विरुद्ध युवक काँग्रेस आक्रमक राहुन त्यांची पोल खोल करेल.
 
Web Title: congress agitation against bjp for jobs