पेट्रोल,डिझेल दरवाढीचा युवक काँग्रेसकडुन निषेध

sanghvi
sanghvi

जुनी सांगवी - महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आयोजित राज्यव्यापी पेट्रोल, डिझेल व गॅस दर वाढ विरोधात पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेस मार्फत निषेध नोंदविण्यात आला. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष सचिन साठे व पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र बनसोडेयांच्या नेतृत्वावाखाली शहरातील विविध पेट्रोल पंपावर पेट्रोल दरवाढी निषेधार्थ पत्रके वाटून निषेध करण्यात आला. 

जुनी सांगवी येथील शितोळे पेट्रोल पंप परिसरात दरवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी युवक कॉंग्रेसचे कुंदन कसबे, सनी कसबे, नरेंद्र बनसोडे, शहराध्यक्ष सचिन साठे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com