काँग्रेसची ध्येय धाेरणे ही नेहमीच समाजहिताची : सत्यशिल शेरकर

दत्ता म्हसकर
शनिवार, 8 डिसेंबर 2018

जुन्नर : कॉंग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे ही नेहमी समाजहिताची राहिली असून सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्याच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार पक्षाने केला असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश सदस्य व विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी येथे केले.

जुन्नर : काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे ही नेहमी समाजहिताची राहिली असून सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्याच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार पक्षाने केला असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश सदस्य व विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी येथे केले.

काँग्रेसच्या नेत्या व माजी अध्यक्षा साेनिया गांधी यांच्या ७२ व्या वाढदिवसाचे आैचित्य साधून जुन्नर तालुका काँग्रेस आय पक्षाच्या वतीने शनिवार (ता.08) येथील छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रूग्णालयातील रूग्णांना फळवाटप करण्यात आले. यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अशाेक घाेलप, महिला तालुकाध्यक्षा अर्चना भुजबळ, बाजार समितीचे संचालक रंगनाथ घाेलप, युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रिती शिंगाेटे, जिल्हा प्रतिनिधी वैभव काेरडे, प्रदिप थाेरवे, सुनिल ढवळे, विघ्नहरचे संचालक देवेंद्र खिलारी, विष्णू शेरकर, पर्यावरण सेलचे सुखदेव नेहरकर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंकुश खंडागळे, उपाध्यक्ष राहुल जाधव, जुन्नर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. प्रशांत शिंदे, डाॅ याेगेश आगम,  शिराेली बुद्रुक कृषक संस्थेचे संचालक दगडु ढाेमसे,   लक्ष्मण शेरकर, सरपंच सचिन विधाटे, संताेष खंडागळे आदी मान्यवर तसेच तालुका काँग्रेस व विविध संस्थाचे पदाधिकारी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. यावेळी सुभाष पाटील गावडे, मंगलदास साेलाट, मारूती वायळ यांची भाषणे झाली. अशाेक घाेलप यांनी आभार मानले.

Web Title: Congress is always a social activist said Satyasheel Sherkar