कॉंग्रेसकडून बुधवारपासून इच्छुकांच्या मुलाखती 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

पुणे - महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती येत्या 28 ते 31 डिसेंबर या कालावधीत कॉंग्रेस भवनात होतील, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस रमेश अय्यर यांनी कळविले आहे. 

या आधी इच्छुकांच्या मुलाखती 27 डिसेंबरपासून घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, काही कारणांमुळे त्या 28 डिसेंबरपासून घेण्यात येणार आहेत. बुधवारी (ता. 28) प्रभाग 1 ते 13, गुरुवारी (ता. 29) प्रभाग 14 ते 26 आणि शुक्रवारी (ता. 30) प्रभाग 27 ते 41 मधील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. या तिन्ही दिवशी मुलाखतीस न आलेल्या इच्छुकांना शनिवारी मुलाखत देता येईल, असेही सांगण्यात येत आहे. 

Web Title: Congress aspirants interviews from Wednesday