कॉंग्रेसच्या मेळाव्यात मोदींवर टीकास्त्र

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

पुणे - 'पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ "मन की बात' करतात; पण देशाच्या विकासासाठी "जन की बात' करीत नाहीत. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र काम करून भाजपची सत्तेची झूल उतरवली पाहिजे,'' अशी टीका आमदार भाई जगताप यांनी केली.

डेक्कन येथे शिवाजीनगर ब्लॉक कमिटीच्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते रविवारी बोलत होते. शहराध्यक्ष रमेश बागवे, ऍड. अभय छाजेड, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, दत्तात्रेय गायकवाड, मनीष आनंद, दत्ता बहिरट, राजेंद्र भुतडा आदी उपस्थित होते.

जगताप म्हणाले, 'सत्तेचा गैरवापर करून राज्यघटनेवर घाला घालण्याचे काम केंद्र सरकारकडून केले जात आहे. आगामी निवडणुकांसाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे.'' बागवे म्हणाले, 'जुन्या आणि नवीन कार्यकर्त्यांना जोडण्यासाठी विभागनिहाय मेळावे घेतले जाणार आहेत.''

डेक्कन - कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते.

Web Title: congress campaign narendra modi politics