पुण्याबाहेरचा उमेदवार लादू नका; इच्छुकांचे साकडे 

Prithviraj Chavan
Prithviraj Chavan

पुणे : "आमच्यातील कुणालाही उमेदवारी मिळाली तरी चालेल. मात्र, बाहेरचा उमेदवार आमच्यावर लादू नका,'' अशी विनंती पुण्यातील इच्छुकांनी कॉंग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली. पुण्यातल्या जागेबाबत काही दिवसांपासून उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर पक्षाच्या वतीने चव्हाण व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (ता. 22) इच्छुकांची भूमिका समजून घेतली. 

पुण्यात झालेल्या या बैठकीला सर्व इच्छुक तसेच आजी-माजी आमदार व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. सांगलीच्या जागेबाबतही बैठकीत चर्चा झाली. सांगलीच्या इच्छुकांशीही चर्चा करून त्यांची भूमिका समजून घेण्यात आली. दोन्ही मतदारसंघांतील इच्छुकांच्या भावना समजून घेतल्याचे या वेळी चव्हाण यांनी सांगितले. या वेळी चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबद्दल भूमिका मांडली. ते म्हणाले, ""शरद पवार यांच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. सातारा- सोलापूर जिल्ह्यातून ते लढत आहेत, याचा मला आनंद आहे. पवार हे कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आहेत. ते प्रचंड बहुमताने निवडून येऊन रेकॉर्ड करतील.'' 

चव्हाण म्हणाले, ""भाजपला पराभूत करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. त्यांना पराभूत केल्यावर बिगरभाजपचाच पंतप्रधान असेल. भाजपला यंदाच्या निवडणुकीत गेल्यावेळीइतक्‍या जागा कोणत्याच राज्यात मिळणार नाहीत. हिंदी भाषक राज्यांत 273 पैकी 223 जागा एकट्या भाजपला गेल्या निवडणुकीत मिळाल्या होत्या. मात्र, या वेळी या पट्ट्यात झालेल्या आघाड्यांमुळे भाजपला किमान 100 जागांचा फटका बसेल. या निवडणुकीत भाजपचे संख्याबळ 170 च्या खाली येणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीनंतर देशात भाजपचे सरकार येणार नाही.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com