Vidhansabha 2019 : काँग्रेसच्या 'या' मागणीमुळे आमदार भरणेंची उमेदवारी धोक्यात  

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. काँग्रेसच्या या मागणीमुळे भरणे तांची उमेदवारी धोक्यात येणार आहे. काँग्रेसचे नेते माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील येथून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी तीव्र ईच्छूक आहेत. पुरंदरमधून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप हे तीव्र इच्छुक आहेत.​

पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ११ पैकी (खडकवासल्यासह) ७ विधानसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडाव्यात आणि यापैकी भोर, पुरंदर आणि हे तीन मतदारसंघ तर आताच काँग्रेसला सोडावेत, अशी मागणी करणारा ठराव पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत मंगळवारी (ता.२७) करण्यात आला.

भोर तालुक्यातील काँग्रेसचे नेते दिलीप बाठे यांनी हा ठराव मांडला होता. एकमताने तो मंजूर करण्यात आला आहे. यामुळे काँग्रेससोबत आघाडी करायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला पुरंदर आणि इंदापूरच्या जागेवर पाणी सोडावे लागणार आहे. भोर पुर्वीपासूनच काँग्रेसकडे आहे.      

इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. काँग्रेसच्या या मागणीमुळे भरणे तांची उमेदवारी धोक्यात येणार आहे. काँग्रेसचे नेते माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील येथून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी तीव्र ईच्छूक आहेत. पुरंदरमधून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप हे तीव्र इच्छुक आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Congress demand will affect MLA Dattatray bharane