कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा आज पुण्यात 

3congress_70.jpg
3congress_70.jpg

 पुणे : भारतीय जनता पक्षप्रणीत केंद्र व राज्य सरकारच्या गेल्या चार वर्षांमधील अपयशी कारभाराविरोधात माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाच्या वतीने पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली आहे. कोल्हापूर येथून सुरवात झालेल्या यात्रेचे आगमन गुरुवारी (ता.6) पुण्यात होणार आहे.

यामध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील यांच्यासमवेत आजी-माजी मंत्री आणि आमदार सहभागी झाले आहेत. कात्रज येथील भारती विद्यापीठामध्ये मुक्काम असणार आहे. सहकारनगर येथील राजीव गांधी ई लर्निंग स्कूल आणि हडपसर येथील भाजी मंडई येथे सभा होणार आहे. त्यानंतर रविवारी (ता. 9) आरटीओ कार्यालयाशेजारील एसएसपीएमएस कॉलेजच्या मैदानामध्ये जनसंघर्ष यात्रेचा समारोप होणार असून, या वेळी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे आणि गुलाम नबी आझाद मार्गदर्शन करणार असल्याचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com