Loksabha 2019 : आता दुसरा मोदीही पळून जाण्याची शक्यता: गायकवाड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

देशात पहिल्यांदाच जवानांच्या नावावर राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे. पुण्यातील लाल महाल हे न्यायाचे तर समताभूमी हे समतेचे ठिकाण आहे. संविधान वाचवण्यासाठी लोकशाही आघाडीच्या ऊमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन मी करत आहे.

पुणे : बँकांचे कर्ज बुडवून नीरव मोदी परदेशात पळून गेला आहे. आता दुसरा मोदीही पळून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अशी जोरदार टीका काँग्रेस नेते प्रविण गायकवाड यांनी केली. 

पुणे आणि बारामतीतील आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे आणि मोहन जोशी यांनी आज (बुधवार) शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. यावेळी झालेल्या प्रचारसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पुण्यातून काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता असलेले प्रवीण गायकवाड यांनीही या सभेला उपस्थिती लावून मोदी सरकारवर जोरदार टीका केली. 

प्रवीण गायकवाड म्हणाले, की देशात पहिल्यांदाच जवानांच्या नावावर राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे. पुण्यातील लाल महाल हे न्यायाचे तर समताभूमी हे समतेचे ठिकाण आहे. संविधान वाचवण्यासाठी लोकशाही आघाडीच्या ऊमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन मी करत आहे.

तर, काँग्रेस नेते अनंत गाडगीळ म्हणाले, की पुणे जिल्ह्यातील बैलालासुद्धा मोदी सरकार नकोय. जर बैलालाही कळत असेल तर आपल्याला का नाही.
 

Web Title: Congress leader Pravin Gaikwad criticize Narendra Modi in Pune