Loksabha 2019 : 'ते' वैयक्तिक बोलतील, तुम्ही मुद्द्यांवर बोला : पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

ही निवडणूक नरेंद्र मोदी आणि भाजपने व्यक्तिकेंद्रीत केली आहे. आताची लढाई निकाराची आहे. आमच्या जाहीरनाम्यावर या निवडणुकीत चर्चा व्हावी. गेल्या चार वर्षांत महाराष्ट्राचा औद्योगिक विकास घसरला आहे. महाराष्ट्र होरपळून निघाला आहे. या सरकारला घालवावे लागणार आहे.

पुणे : तुमच्यावर त्यांच्याकडून वैयक्तिक टीका केल्या जातील, त्याला उत्तर देत बसू नका. ते वैयक्तिक बोलतील, तुम्ही मुद्द्यांवर बोला, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

पुणे आणि बारामतीतील आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे आणि मोहन जोशी यांनी आज (बुधवार) शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. यावेळी झालेल्या प्रचारसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते. या प्रचारसभेचा समारोप मी या लबाड मोदी सरकारला मतदान करणार नाही, अशी शपथ घेऊन करण्यात आला.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की ही निवडणूक नरेंद्र मोदी आणि भाजपने व्यक्तिकेंद्रीत केली आहे. आताची लढाई निकाराची आहे. आमच्या जाहीरनाम्यावर या निवडणुकीत चर्चा व्हावी. गेल्या चार वर्षांत महाराष्ट्राचा औद्योगिक विकास घसरला आहे. महाराष्ट्र होरपळून निघाला आहे. या सरकारला घालवावे लागणार आहे. २३ मे रोजी निकाल लागेल, तेव्हा मोदी पंतप्रधान नसतील. लोकसभा निवडणुकीनंतर देशात काँग्रेस आघाडीचे सरकार असेल.

Web Title: Congress leader Prithviraj Chavan attacks Narendra Modi in Pune rally