'त्या' वक्तव्यावर ठाम : पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

या निवडणुकीत तिन्ही पक्षांना मिळालेल्या जागा पाहून शिवसेनेने हा प्रस्ताव दिला होता.

पुणे : महाराष्ट्रात 2014 विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेवर आलेले भाजप सरकार पाडण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर आपण ठाम आहोत, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी (ता.22) सांगितले. काही राजकीय संकेत असतात. त्यामुळे यामागे कोण होते, त्याचे नाव मी घेणार नाही, असेही ते म्हणाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्रात 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला एकत्र घेण्याबाबतचा प्रस्ताव दिला होता; परंतु तो आपण नाकारला, असे चव्हाण यांनी जाहीर वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले होते. त्यावर बुधवारी पुण्यात चव्हाण यांना पत्रकारांनी विचारले असता ''आपण आपल्या विधानावर ठाम आहोत,'' असे सांगितले.

- 'माळेगाव'चे अध्यक्ष रंजन तावरे यांना जामीन मंजूर

ते म्हणाले, ''या निवडणुकीत तिन्ही पक्षांना मिळालेल्या जागा पाहून शिवसेनेने हा प्रस्ताव दिला होता. तो कोणी दिला होता, त्यांचे नाव जाहीर करणे राजकीय संकेतात बसत नाही.'' 
मंत्रिमंडळातील सहभागाबाबत बोलताना ते म्हणाले, ''यापूर्वी मी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. प्रत्येक वेळी संधी मिळालीच पाहिजे असे नाही.''

- Video : मी सक्तीच्या रजेवर हे मला माध्यमांतूनच कळले : योगेश सोमण

मंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावर विचारले असता, ''मी ते ऐकलेले नाही. त्यामुळे त्यावर काही बोलू शकणार नाही,' असे ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader Prithviraj Chavan commented about BJP