काँग्रेसचे निष्ठावंत नेते राहुल बालवडकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Balwadkar

एकेकाळचे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते राहुल बालवडकर यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार तसेच खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसचे निष्ठावंत नेते राहुल बालवडकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

बालेवाडी - येथील एकेकाळचे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते राहुल बालवडकर यांनी मुंबई येथे (ता. २७ सप्टेंबर २०२२) विरोधी पक्ष नेते अजित पवार तसेच खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे पदाधिकारी सागर बालवडकर यांना उमेदवारी मिळणार की राहुल यांना याची चर्चा परिसरात रंगली आहे.

राहुल हे एकेकाळचे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचे चुलत बंधू आहेत. त्यांनी काँग्रेस पक्षाकडून २००७ ची महापालिका निवडणूक लढवली होती. त्यावेळी माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे कडून त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर काही वर्ष राजकारणापासून अलिप्त राहून, पुन्हा २०१७ मध्ये आपले चुलत बंधू भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांना निवडणुकीसाठी मार्गदर्शन करत मोठी मदतही केली.

महापालिका निवडणुका तोंडावर असतानाच राहुल बालवाडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे ते आपलेच बंधू अमोल बालवडकर यांच्या विरोधात उभे ठाकणार का? अशी चर्चा परिसरामध्ये सुरू झाली आहे. या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सागर बालवडकर हे महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आहेत .आता राहुल बालवडकर यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळे पक्षांतर्गत आव्हान निर्माण होऊ शकते . यामध्ये माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे, कारण चांदेरे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक तसेच अजित पवार यांच्या जवळच्या पैकी एक आहेत. आता राष्ट्रवादीचे खरे उमेदवार कोण? हे निवडणुका जाहीर झाल्यावरच समजणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कामाची पद्धत आणि विचारसरणी आवडल्याने या पक्षात प्रवेश केला. अजित पवार आणि जयंत पाटील जी जवाबदारी देतील ती चोख पणे पार पाडणार आहे.

- राहुल बालवडकर

टॅग्स :Ajit PawarCongressNCP