टिळेकर यांच्या अटकेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे आंदोलन

टिळेकर यांच्या अटकेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे आंदोलन

पुणे - आमदार योगेश टिळेकर यांना अटक करावी या मागणीसाठी, तसेच त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणारे पोलिस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या बदलीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. 

हडपसर पोलिस ठाण्यात भाजपचे आमदार टिळेकर यांच्याविरुद्ध ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तो दाखल करणारे पोलिस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची बदली केली आहे. हा प्रकार म्हणजे भाजप सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
तुपे म्हणाले, ‘‘कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याची बदली करणे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खंडणीखोर आणि गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.’’ 

भाजप सत्तेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. या वेळी माजी महापौर प्रशांत जगताप, कमल व्यवहारे, वैशाली बनकर, कमल ढोले पाटील, रुपाली चाकणकर, सोनाली मारणे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com