कॉंग्रेस-राष्ट्रवादीमुळेच एमआयएम राजकारणात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

पुणे - ""कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने 15 वर्षे महाराष्ट्रात सत्ता असतानाही मुस्लिम समाजाला शिक्षण, आरोग्य, निवारा व अन्य सुविधांपासून वंचित ठेवले. असंख्य मुस्लिम तरुणांना तुरुंगात डांबले. पुण्यातील वक्‍फ समितीच्या जमिनी बळकावल्या. त्यांच्या नाकर्तेपणामुळेच "एमआयएम'ला महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करावा लागला,'' अशी टीका ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुसलिमिनचे नेते (एमआयएम) आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी बुधवारी केली.

महापालिका निवडणुकीसाठी ओवेसी यांनी "एसएसपीएमएस'च्या मैदानावर सभा घेतली. या वेळी आमदार इम्तियाज जलील, राज्य समितीचे सदस्य अंजुम इनामदार, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे अध्यक्ष डॉ. सुरेश माने, प्रदेश महासचिव सर्वजीत बनसोड, पश्‍चिम महाराष्ट्र प्रभारी मिलिंद अहिरे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे, "एमआयएम'चे शहराध्यक्ष जुबेर शेख, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आकील मुजावर आदी उपस्थित होते.

ओवेसी म्हणाले, ""पुण्यातील दोन हजार 728 वक्‍फच्या मालमत्ता गिळंकृत केल्या. आता दुल्हा-दुल्हन कब्रस्तानची जमीन लाटली. आम्हाला आमची जमीन पुन्हा द्या, आमच्या समाजाचा विकास आम्ही करू. 70 वर्षांपासून आम्हाला विकासापासून वंचित ठेवले. आता हा अन्याय सहन न करता मतदानाद्वारे आमची ताकद दाखवून देऊ.''

हा देश आमचाही आहे...
देश चांगला आहे, त्याला स्वच्छतेची गरज नाही. मात्र या देशातील भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी अस्वच्छता दूर केली पाहिजे. हा देश तुमचा आहे, तितकाच आमचा व सर्वांचा आहे, असे सांगत ओवेसी यांनी नोटाबंदी, काश्‍मीरप्रश्‍न, मोदींचे परदेशगमन, मुस्लिमांवरील अत्याचारासारखे प्रश्‍न उपस्थित केले.

Web Title: Congress-NCP attributed MIM politics