Nana Patole : बारामतीतील कॉंग्रेस कार्यालयाचे नूतनीकरण होणार

काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे जिल्हा ओ.बी.सी. विभाग आयोजित मेळावा नुकताच बारामतीत झाला.
Nana Patole
Nana Patolesakal

बारामती - शहरातील कॉंग्रेसच्या कार्यालयाचे लवकरच नूतनीकरण केले जाईल, पाच लाखांची तातडीची तरतूद करीत असून भविष्यात गरज भासल्यास आणखी खर्च केला जाईल, अशी ग्वाही कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे जिल्हा ओ.बी.सी. विभाग आयोजित मेळावा नुकताच बारामतीत झाला. त्यात पटोले यांनी ही घोषणा केली. बारामती काँग्रेस कमिटीचे नूतनीकरण हवे म्हणून महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष रोहित बनकर यांनी वारंवार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्याकडे मागणी केली होती.

येथील काँग्रेस कमिटीचा इतिहास पाहिला तर या कमिटीला इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, राजीव गांधी, माधवराव सिंधिया, राजेश पायलट, रजनीताई सातव, रामराव आदिक, गोविदराव आदिक, रामकृष्ण मोरे यांनी भेट दिली आहे.

ओबीसी मेळाव्या निमित्त संधी मिळाली असता भानुदास माळी यांनी नानाभाऊ पटोले यांच्याकडे बारामती काँग्रेस कमिटीचे नूतनीकरण व्हावे अशी मागणी केली असता, नानाभाऊ पटोले यांनी दखल घेत एका वर्षाच्या आत काँग्रेस कमिटीचे नूतनीकरण करण्याची घोषणा केली.

आमदार संजय जगताप, माजी आमदार रामहरी रुपनवर, प्रदेशाध्यक्ष ओबीसी विभाग भानुदास माळी, नंदकुमार कुंभार, महाराष्ट्र प्रदेश रोहित बनकर, जसा भाई मोटवानी, राजाभाऊ बरकडे, अशोक इंगुले, राजाभाऊ निंबाळकर, आकाश मोरे, अॅड.इनक्लाब शेख, सुरज भोसले, विजय भिसे, वैभव बुरुंगले, वीरधवल गाडे, संकेत सोनवणे, सौरभ रुपनवर, बिलाल बागवान, सुरज भोसले, योगेश महाडिक, बाळासाहेब देवकाते, तुषार ओव्हाळ, संजय चांदगुडे, जालिंदर कुतवळ, राहुल वाबळे, योगेश महाडिक, अॅड. बिलाल बागवान, अॅड. स्वरूप सोनवणे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com