कॉंग्रेसची स्वबळाची तयारी? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

पुणे - आघाडीची शक्‍यता मावळल्याने कॉंग्रेसने स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीसाठी मुंबईत गेलेल्या पुण्यातील कॉंग्रेस नेतृत्वाने 162 उमेदवारांची छाननी सुरू केली आहे. 

कॉंग्रेसने 67 जागांचा दिलेला प्रस्ताव राष्ट्रवादी कॉंग्रेसने फेटाळल्यानंतर आघाडीतील बिघाडी होण्यास सुरवात झाली. त्यानंतरही कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्यात चर्चा होऊन आघाडीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा कॉंग्रेसच्या विद्यमान नगरसेवकांनी बाळगली असल्याचे समजते. 
जागांच्या संख्येशी तडजोड करून आघाडी न करण्यावर कॉंग्रेस नेतृत्व ठाम होते. त्यामुळे मुंबईत पार्लमेंटरी बोर्डासाठी गेलेल्या शहर कॉंग्रेसच्या नेत्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची वेळ आल्यास संभाव्य यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे, अशी माहिती पुढे आली आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत पार्लमेंटरी बोर्डाची बैठक सुरू झाली नव्हती. त्यामुळे आघाडीबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता कायम होती. आघाडी झाल्यास आपली जागा राखून ठेवण्यासाठी काही नगरसेवकांनी थेट मुंबई गाठली असल्याचेही समजते.

Web Title: Congress is preparing to ourselves