काँग्रेसचा सोमवारी मूकमोर्चा; भाजप सरकारचा निषेध करणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

पुणे : भाजपने चार वर्षांत जनतेची फसवणूक केली आहे. त्यांची ही कारकीर्द काळीकुट्ट असल्याचा आरोप शहर काँग्रेसने केला असून, सोमवारी (ता. 28) मूकमोर्चा काढून भाजप सरकारचा निषेध केला जाणार आहे. 

काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी पत्रकार परिषदेत केंद्रातील भाजप सरकारच्या कामावर टीका केली व मोर्चाविषयी माहिती दिली. या वेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, दीप्ती चवधरी, अभय छाजेड, कमल व्यवहारे, सुनील शिंदे, मनीष आनंद, संगीता तिवारी उपस्थित होत्या.

केंद्र सरकार हे अपयशी ठरले असून, त्याचा निषेध करण्यासाठी मूकमोर्चाचे आयोजन केले आहे. महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळा येथे सकाळी साडेदहा वाजता मोर्चास प्रारंभ होईल. केशवराव जेधे चौकात मूक मोर्चाची सांगत होईल. 

पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचाच 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुण्याची लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरील दाव्याचा पुनरुच्चार केला. याबाबत माजी शहराध्यक्ष छाजेड यांनी पुणे लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत मिळालेल्या मतांचा विचार करता येणार नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगली मते मिळाली आहेत, असेही बागवे यांनी नमूद केले. 

Web Title: Congress to protest against BJP Government