जुन्नरमधील कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा जिल्हाध्यक्षांना घेराव

CONGRESS
CONGRESS

जुन्नर (पुणे) : जुन्नर विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हा कॉंग्रेस आक्रमक झाली असून, आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ कॉंग्रेसकडेच राहावा, यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसच्या राज्य नेतृत्वाकडे आग्रह धरला आहे.

कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाली असून, जुन्नरची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आली आहे. येत्या 3 ऑक्‍टोबरला आपण अर्ज भरणार असल्याचे युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी जाहीर केले. मात्र, त्यांची ही घोषणा विरत नाही तोवर तालुका कॉंगेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जुन्नरच्या जागेसाठी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांना मंगळवारी (ता. 24) पुणे येथे कॉंग्रेस भवनात घेराव घातला. यामुळे या जागेचा तिढा कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. जुन्नर तालुक्‍याची आघाडीची जागा अद्याप कोणालाही जाहीर झाली नसल्याचे या वेळी सांगण्यात आले. जुन्नरच्या जागेसाठी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सत्यशील शेरकर यांचे नाव घोषित करावे यासाठी कार्यकर्त्यांनी संजय जगताप यांच्यासमोर जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

यावेळी माजी आमदार दिलीप ढमढेरे, तालुका अध्यक्ष अशोक घोलप, महिला अध्यक्ष अर्चना भुजबळ, युवक अध्यक्ष अंकुश खंडागळे यांनी जगताप यांच्याशी चर्चा केली. यावेळी जुन्नर विधानसभेची जागा कॉंग्रेसकडेच असेल यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार असल्याचे संजय जगताप यांनी जाहीर केले.

यावेळी उपाध्यक्ष संग्राम मोहोळ, महेश बापू ढमढेरे, प्रांतिक सदस्य सत्यशील शेरकर, जिल्हा समिती सदस्य देवेंद्र खिलारी, वैभव कोरडे, प्रदीप थोरवे, सुनील ढवळे, दत्ता गाडगे, तालुका उपाध्यक्ष राहुल फुलसुंदर, सचिन हाडवळे, मंगलदास सोलाट, सुभाष गावडे, सुखदेव नेहरकर, नितीन दांगट, सचिन टाव्हरे, प्रकाश जाधव, कुंडलिक शिंदे, अंकुश खंडागळे, राहुल जाधव, नगरसेविका हाजरा इनामदार, शांता कुटे, योगिता शेळके, जिल्हा युवती अध्यक्ष प्रीती शिंगोटे, भानुदास पानसरे, बाळाभाऊ विश्वासराव, कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, जुन्नरच्या जागेवरून आघाडीच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांत दावे प्रतिदावे केले जात असून ही जागा नेमकी कोणाला सुटणार याची उत्सुकता लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com