आत्महत्येस मोदी सरकारच जबाबदार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

पुणे - निवृत्त सैनिक रामकिशन ग्रेवाल यांनी केलेल्या आत्महत्येस मोदी सरकारच जबाबदार आहे, असा आरोप करत शहर जिल्हा कॉंग्रेस समितीने गुरुवारी मोदी सरकारच्या निषेधार्थ आंदोलन केले. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना ग्रेवाल कुटुंबीयांची भेट घेण्यास मज्जाव करून त्यांना ताब्यात घेण्याचा प्रकार लोकशाहीला काळिमा फासणारा आहे, अशी टीका उपस्थित नेत्यांनी केली. 

कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली डेक्कन येथील गोपाळकृष्ण गोखले चौकात आंदोलन करण्यात आले. या वेळी उपमहापौर मुकारी अलगुडे, उल्हास पवार, ऍड. अभय छाजेड, गोपाळ तिवारी, कमल व्यवहारे, अरविंद शिंदे, बाळासाहेब शिवरकर, विकास लांडगे, भूषण रानभरे, अजित दरेकर, मनीष आनंद, सदानंद शेट्टी, सुनील मलके, हाजी नदाफ, नीता रजपूत आदी उपस्थित होते. मोदी सरकार विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

बागवे म्हणाले, ""मोदी सरकार सूडबुद्धीने काम करत आहे. ग्रेवाल यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यास गेलेल्या राहुल गांधी यांना ताब्यात घेण्याचा प्रकार निंदनीय आहे. तसेच पोलिसांनी ग्रेवाल यांच्या कुटुंबीयांना ताब्यात घेऊन त्यांनाही धक्काबुक्की केली. या प्रकारातून मोदी सरकारने लोकशाही संपविण्याचा विडा उचलल्याचे सिद्ध झाले आहे.'' 

Web Title: Congress workers protest