पुणे पालिकेत समाविष्ट होताना नागरिकांच्या मागण्या विचारात घ्या

Eknath Shinde
Eknath Shinde

खडकवासला - पुणे महापालिकेत 23 गावं समाविष्ट होताना नागरिकांच्या मागण्या विचारात घ्या. अशी मागणी एका निवेदनाद्वारे खडकवासला शिवसेनेने राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

पुणे महानगर पालिकेच्या हद्दीलगत उर्वरित 23 गावांचा समावेश करण्याचा अध्यादेश 23 डिसेंबर रोजी राज्य सरकारने काढला आहे. लवकरच ही गावे महानगर पालिकेत समाविष्ट होतील. परंतु मागील दोन वर्षांपूर्वी अंशतः अकरा गावांचा समावेश केला आहे. येथील काही प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. या प्रमाणे या 23 गावांचे प्रश्न प्रलंबित राहू नयेत. तसेच नागरिकांच्या मागण्यांचा विचार केला जावा. अशा आशयाचे निवेदन शिवसेना खडकवासला मतदार संघांचे विधानसभा प्रमुख नितीन वाघ, शहर सचिव मकरंद पेठकर, रामदास गायकवाड, सागर मोहकर व मुकेश पोटे यांनी केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 या भागातील जिल्हानपरिषदेच्या शाळेचे शिक्षक, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व केंद्र राज्याच्या मदतीने चालू असलेल्या अंगणवाडी सेविका यांच्याबाबत निर्णय झालेला नाही. 

गावात विकास कामे झाली. त्यांची बिले प्रलंबित आहेत. या भागातील गुंठेवारीतील नोंदी व दस्त नोंदणी अजूनही सुरू झालेली नाहीत. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना कर्ज काढून घर घेता येत नाही. अनेक लोकांचे पैसे विकसकांकडे अडकून पडले आहेत. यासाठी 1997 साली गावांचा समावेश केल्यानंतर या गावात गुंठेवारी कायदा लागू केला होता तसाच कायदा गावे समाविष्ट करताना लागू करावा. या गावात अजून विकासकामे सुरु देखील झाली नाहीत तेच नागरिकांना जाचक वाढीव दराने मालमत्ता कराची आकारणी करण्यात आली आहे.

1997 साली समाविष्ट गावातील नागरिकांना करात सवलत देऊन ज्या सालचे घर त्या सालचा कर अशा पद्धतीने कर आकारणी करून सवलत देण्यात आली होती. तशीच सवलत नवीन गावांना देण्यात यावी. या गावांचा विकास आराखडा करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करून देण्यात यावी. नवीन 23 गावे समाविष्ट करताना या बाबींचा विचार व्हावा.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com