महापुरुषांच्या नावाखाली समाज तोडण्याचे कारस्थान - नागनाथ कोत्तापल्ले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

‘सध्या महापुरुषांच्या पळवापळवीचे सत्र सुरू आहे. त्यामुळे त्यांचे कार्य मर्यादित राहत आहे. लोकांना एकमेकांपासून तोडण्याचे कारस्थानच होत आहे. त्यामुळे आता समाजात सजगता हवी,’’ अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केली.

पुणे - ‘सध्या महापुरुषांच्या पळवापळवीचे सत्र सुरू आहे. त्यामुळे त्यांचे कार्य मर्यादित राहत आहे. लोकांना एकमेकांपासून तोडण्याचे कारस्थानच होत आहे. त्यामुळे आता समाजात सजगता हवी,’’ अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताह सोमवारी (ता. २) आयोजित केला आहे. त्याच्या उद्‌घाटन प्रसंगी डॉ. कोत्तापल्ले बोलत होते. ज्येष्ठ व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर, उल्हास पवार, सप्ताहाचे संयोजक मोहन जोशी, अरविंद शिंदे, संजय बालगुडे उपस्थित होते.

डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, ‘‘देशात वेगळे वातावरण निर्माण झाले असतानाही माध्यमांच्या भूमिकेला महत्त्व दिले जात नाही. लोकांना विचार मांडण्याची मोकळीक नाही. ही बाब लोकशाहीसाठी चिंताजनक आहे. सध्या पत्रकारांपासून एकाही घटकाला सरकारच्या धोरणांवर बोलता येत नाही. ’’

डॉ. शेजवलकर म्हणाले, ‘‘उद्योगांमध्ये मंदीचे वातावरण आहे. मात्र, या वस्तुस्थितीची नेमकी माहिती केंद्र सरकारपर्यंत पोचत नाही. उद्योगांना चालना देऊन रोजगारनिर्मितीवर भर दिल्यास मंदीचा परिणाम जाणवणार नाही. तसेच, भांडवलनिर्मितीसाठी ठोस उपाययोजना करण्याकडे सरकार काणाडोळा करीत आहे.’ या वेळी पवार, जोशी यांचीही भाषणे झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Conspiracy to break society in the name of legends