राज्यघटनेने समानतेचा अधिकार दिला - अशोक धिवरे

रमेश मोरे
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास नियमित पुष्पमाला अर्पण करण्यासाठी संकल्प पुष्पमाला या उपक्रमाद्वारे अनुयायांनी स्वतचे, कुटुंबातील नातेवाईकांचे वाढदिवस 'एक वही एक पेन', संकलित करून साजरा करण्यात यावा ही या उपक्रमाची संकल्पना होती.

जुनी सांगवी - भारतीय राज्यघटना लोकशाही व धर्मनिरपेक्ष आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना समता व बंधूभावाने राहिले पाहिजे, असा समानतेचा अधिकार भारतीय राज्यघटनेने प्रत्येक माणसाला दिला आहे. असे मत संकल्प पुष्पमाला द्वितीय वर्ष सोहळ्यात सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी श्री अशोक धिवरे यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास नियमित पुष्पमाला अर्पण करण्यासाठी संकल्प पुष्पमाला या उपक्रमाद्वारे अनुयायांनी स्वतचे, कुटुंबातील नातेवाईकांचे वाढदिवस 'एक वही एक पेन', संकलित करून साजरा करण्यात यावा ही या उपक्रमाची संकल्पना होती. गेली दोन वर्षापासुन हा उपक्रम शहराच्या विविध उपनगरांतून संकल्प पुष्पमाला अर्पण समिती राबवत आहे.

यानिमित्त द्वितीय वर्षपुर्तीनिमित्त समाजबांधवांच्या वतीने चिंचवड येथील दर्शन हॉल येथे द्वितिय वर्षपुर्ती आनंद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात प्रा. वृषाली रणधिर यांनी महिला बचत गटातील महिलांना उद्योग व्यवसाय कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. तर सुनिल कांबळे यांनी तरुणांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी कशी तयारी करावी याबाबत मार्गदर्शन केले.

तिसऱ्या सत्रात भीमगीतांसोबत मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी किरण खाजेकर हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वीणा कांबळे यांनी केले. तर प्रमोद डोंगरदिवे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी रमेश जाधव, विलास कांबळे, प्रमोद गायकवाड, शिवदास ताकतोडे, विजय कांबळे, शैलेश बैसाने, प्रदिप पवार आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: The Constitution gave equality rights Says Ashok Dhivre