संविधानासाठी, समतेच्या न्यायासाठी धावले पुणेकर

संविधानासाठी, समतेच्या न्यायासाठी धावले पुणेकर

पुणे - संविधान सन्मान समितीच्या वतीने संविधान जागर सप्ताहाअंतर्गत आयोजित ‘संविधान दौड’मध्ये पुणेकर धावले. रविवारी (ता. २५) सकाळी ‘एक धाव समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्वासाठी...एक धाव आपल्या संविधानासाठी’ असा उद्‌घोष करीत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील आंबेडकर पुतळ्यापासून सणस मैदानापर्यंत पुणेकर धावले.

सकाळी सात वाजता महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र सचिव व संविधान दौडचे मुख्य संयोजक बाळासाहेब जानराव, पश्‍चिम महाराष्ट्र आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, नगरसेविका सुनीता वाडेकर, शहराध्यक्ष अशोक कांबळे यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते या संविधान दौडचे आंबेडकर पुतळ्याजवळ उद्‌घाटन झाले, तर दौडची सांगता सणस मैदानावर झाली. 

महाराष्ट्र ॲथलेटिक संघाचे अध्यक्ष अभय छाजेड यांच्या हस्ते दौडमधील सहभागी स्पर्धकांना गौरविण्यात आले. त्यामध्ये पुरुष गटात रविकुमार महतो, स्वामिनाथ आसवले, अब्दुल कुरेशी, प्रेम कांबळे, शब्बीर मंसूरी, दीपक शुक्‍ला, मोबिन शेख, सुदेश कदम, अशोक जाधव, रतन बोदरे,  अक्षय कांबळे, भूषण बांगरे, स्वस्तिक कसबे, अजय ठाकूर, बबन वाघचौरे यांना, तर महिला गटात रसिका पवार, प्रतीक्षा खरात, रईसा चम्बूर, सोनाली कोकाटे, श्रद्धा मांजरे यांना आणि अपंग गटात बबन बोराडे यांना सन्मानित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com