बांधकाम क्षेत्रात दिवाळी थंडच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

‘दिवाळ सण मोठा, नाही आनंदा तोटा’ असे म्हटले जाते. परंतु, बांधकाम क्षेत्रासाठी यंदाची दिवाळी फारशी लाभदायक ठरली नाही. यंदा दिवाळीच्या पाच दिवसांत राज्यभरात घरखरेदीचे ४ हजार २४४ दस्त नोंदविण्यात आले आहेत. यातून नोंदणी व मुद्रांक विभागाला ९६ कोटी ४४ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यामध्ये पुणे शहरात केवळ २०८ दस्त नोंदले गेले.

पुणे - ‘दिवाळ सण मोठा, नाही आनंदा तोटा’ असे म्हटले जाते. परंतु, बांधकाम क्षेत्रासाठी यंदाची दिवाळी फारशी लाभदायक ठरली नाही. यंदा दिवाळीच्या पाच दिवसांत राज्यभरात घरखरेदीचे ४ हजार २४४ दस्त नोंदविण्यात आले आहेत. यातून नोंदणी व मुद्रांक विभागाला ९६ कोटी ४४ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यामध्ये पुणे शहरात केवळ २०८ दस्त नोंदले गेले. 

दिवाळीचा मुहूर्त साधत घरखरेदीचे दस्त नोंदविण्याकडे नागरिकांचा कल असतो. नागरिकांच्या सोयीसाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने दि. २५ ते दि. २९ ऑक्‍टोबर या पाच दिवसांच्या कालावधीत राज्यातील काही दुय्यम निबंधक कार्यालये उघडी ठेवली होती. या पाच दिवसांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातील दस्तनोंदणीतून ४ कोटी ५५ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. 

मागणी नसल्याने दिवाळी सणामध्ये पुणे शहरात केवळ एक आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील दोन दुय्यम निबंधक कार्यालये खुली ठेवण्यात आली होती. पुणे व पिंपरी-चिंचवड मिळून जवळपास २४ हून अधिक दस्तनोंदणी कार्यालये आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Construction Field diwali