उंड्री - पाचव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजूर ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

उंड्री - गुलाम अली नगर गल्ली नं 6 दि.13 ऑगस्ट दु.12.30 वाजता एका निर्माणाधीन इमारतीचे काम सुरू असताना पाचव्या मजल्यावर पडून राजशेखर माशाले (वय 33 वर्षे) रा.कालेपडल हडपसर मजूर ठार झाला. दोन मजूर किरकोळ जखमी झाले.
घटनेस चार दिवस उलटून ही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, गुलामअली नगर गल्ली नं 6 येथे  (महानगरपालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवून दोन गुंठ्यामध्ये) पाच मजली अपार्टमेंटचे काम चालू आहे. कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने येथे काहीच उपाय योजना  केली नसल्याचे निदर्शनास आलेले आहे. कामगारांना सुरक्षा बेल्ट, हेल्मेट पण नाही अपार्टमेंटला बाहेरून जाळी बसवण्यात आली नाही. याचा परिणाम म्हणून ही दुर्घटना घडली .या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत मालकावर व ठेकेदारावर गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते असे अजून पर्यंत झाले ले नाही. 

या प्रकरणात पोलिसांकडून अक्षम्य दुर्लक्ष
महंमदवाडी पोलीस चौकीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शेखर शिंदे म्हणाले : जखमी व घटनास्थळी उपस्थित मजुरांचे जबाब घेणे सुरू आहे. त्यानंतर दोषी असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. बिल्डर आणि कंत्राटदार यांच्यात करार झाला असल्यामुळे बिल्डर वर गुन्हा दाखल करता येत नाही. अनाधिकृत बांधकामाचा प्रश्न महापालिकेच्या अखत्यारीत येतो.
महापालिका अनाधिकृत बांधकाम विभागाशी संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Construction laborer killed after falling from the fifth floor