बांधकाममंत्र्यांनी कोल्हापूर-मुंबई महामार्गावरील खड्ड्यांची दिवसा पहाणी करावी - नाना काटे

navi-sanghavi
navi-sanghavi

नवी सांगवी (पुणे) - मुंबई-बेंगलोर महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले असताना राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील याकडे कसे काय दुर्लक्ष करीत आहेत. कोल्हापूर वरून मुंबईला ये जा करताना त्यांना हे दिसत नाही का? असा संतप्त सवाल पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व नगरसेवक नाना काटे यांनी केला आहे. नाना यांनी नामदार पाटील यांच्या कारभारावर खरमरीत टिका करीत 'सेल्फी विथा खड्डा' घेऊन तो त्यांना पाठविला आहे. 

शुक्रवारी मुंबई – गोवा महामार्गावरील खारेपाटण ते झाराप या मार्गाची पाहणी करण्यासाठी बांधकाम चंद्रकांत पाटील गेले होते. परंतु, रात्रीच्या वेळी बांधकाम मंत्री आल्याने त्यांच्या निदर्शनास रस्त्यावर खड्डे दिसलेच नाहीत असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. 

या वृत्ताचाच हवाला घेत नाना म्हणाले, "तशीच अवस्था मुंबई-बेंगलोर महामार्गवरती आहे. येथेही मंत्रीमहोदयांनी रात्रीचाच दौरा केल्याने त्यांच्या नजरेस खड्डे पडले नाहीत. त्यामुळे याची पुनरावृत्ती पुणेकरांच्या बाबतीत होवू नये म्हणून कोल्हापूर-मुंबई रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी दौरा दिवसा करण्याची मागणी नाना काटे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com