बांधकाम मजुरांची सुरक्षा वाऱ्यावर

रवींद्र जगधने 
सोमवार, 7 मे 2018

पिंपरी - बांधकाम मजुरांचा सुरक्षेच्या उपाययोजनांअभावी मृत्यू होण्याच्या घटना वारंवार घडत असताना, महापालिका थेरगाव रुग्णालयाच्या बांधकाम साइटवरच मजुरांच्या जिवीताच्या दृष्टिकोनातून उपाययोजना केल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. कायद्यानुसार मजुरांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करणे बंधनकारक आहे. महापालिका मात्र, या कायद्याला पायदळी तुडवत आहे. 

थेरगाव येथे महापालिकेचे दोनशे खाटांच्या तीनमजली रुग्णालयाचे दीड वर्षापासून काम सुरू असून तिसऱ्या मजल्याच्या स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. सुमारे साठ ते सत्तर मजूर येथे काम करतात. 

मात्र, त्यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, हातमोजे, सेफ्टी शूज व इमारतीच्या बाजूला जाळ्या अशा कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. तसेच मजुरांच्या राहण्याच्या खोल्याही इमारतीलगत असून कामगारांची लहान मुलेही परिसरात खेळत असतात. इमारतीच्या खांबाचे काम करताना कामगार असुरक्षितपणे फळीवर उभे राहून काम करतात. 

इमारतीच्या बाजूला पाण्याच्या टाकीसाठी मोठा खड्डा खोदला असल्याने तेथेही सुरक्षेबाबत निष्काळजीपणा दिसत आहे. 

विशेष म्हणजे महापालिकेचे अभियंतेही बांधकामाची पाहणी करताना हेल्मेट वापर करत नसल्याने सुरक्षिततेबाबत प्रशासन किती गंभीर आहे. यावरून दिसून येते. 

ईगल इफ्रा इंडिया लिमिटेडचे ठेकेदार थेरगाव रुग्णालयाचेही काम करत आहे. सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याबाबत ठेकेदाराला पत्र देणार आहे, तसेच याठिकाणी कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असते. 
- प्रमोद ओंबासे, कार्यकारी अभियंता, महापालिका स्थापत्य विभाग 

महापालिका आयुक्त व कामगार आयुक्त यांना याबाबत पत्र देणार आहे. एखादी घटना घडल्यावर महापालिका व कामगार विभाग मोठ्या उपाययोजना केल्यासारखे मोठी धावपळ करते. मात्र, अगोदरच मजुरांच्या सुरक्षेबाबत काळजी घेतल्यास मजुरांना जीव गमवावा लागणार नाही. 
- काशिनाथ नखाते, अध्यक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघ 

Web Title: Construction of the safety of workers issue