पुणे व सोलापूर जिल्ह्याचा संपर्क तुटण्याच्या मार्गावर

राजकुमार थोरात
रविवार, 4 ऑगस्ट 2019

वीर धरणातून 67 हजार 500 क्‍युसेक वेगाने पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीला पूर आला आहे.
 

वालचंदनगर (पुणे) - वीर धरणातून 67 हजार 500 क्‍युसेक वेगाने पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीला पूर आला आहे.

इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर जवळ कळंबोली च्या पुलावरून नीरा नदीचे पाणी वाहण्यास सुरुवात झालेली आहे. पाण्याचा प्रवाह जोरात आहे दहा वर्षानंतर नीरा नदीला एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. इंदापूर तालुक्यातील पावसाने पाठ फिरवली आहे. मात्र, निरा नदी दुथडी भरून वाहत आहे. इंदापूर माळशिरस तालुक्यातील नागरिकांनी दोन्ही बाजूने पुराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी केली पाणी पाण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पुलावरील वाहतूक बंद केली.

वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार सहायक फौजदार मोहन फाळके शिवाजी सातव सार्वजनिक बांधकाम विभागाचे राजेंद्र चौधरी पुराच्या पाण्यावरती लक्ष ठेवून आहेत. पुणे व सोलापूर जिल्ह्याचा संपर्क तुटणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: contact Pune and Solapur district will be disconnect