चांगले काम करणाऱ्यांना कायम पाठिंबा   - गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी मी नेहमी उभा असतो. जे गरजू कलाकार आहेत, जे कलेसाठी धडपड करतात, त्यांना माझा पाठिंबा असेल, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

पुणे - चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी मी नेहमी उभा असतो. जे गरजू कलाकार आहेत, जे कलेसाठी धडपड करतात, त्यांना माझा पाठिंबा असेल, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

नटरंग ॲकॅडमी, पुणेतर्फे अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओक यांना २५ वा शाहीर मधू कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान कला गौरव पुरस्कार बापट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. मानाचा तुरा, श्रीफळ, शाल, तुळशी रोप, मानपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी अभिनेत्री जयमाला इनामदार, सुहासिनी देशपांडे, लीला गांधी, मंजिरी ओक आदी उपस्थित होते. बापट म्हणाले, ‘‘धडपड करणाऱ्या कलाकारांसाठी ही संस्था काम करते. त्यामुळे मी जर खासदार झालो तर माझ्या निधीतील एक लाख रुपये या संस्थेसाठी डिपॉझिट म्हणून देईन.’’ ओक म्हणाले, ‘‘आजपर्यंत इतर अनेक संस्थांनी पुरस्कार दिले आहेत. परंतु त्यामध्ये राजकारण, स्पर्धा या सर्व गोष्टी होत्या. आत्ता मिळालेल्या पुरस्कारामध्ये प्रेम, माया हे ओतप्रेत भरलेले आहे. पुणे ही माझी जन्मभूमी आहे. त्यामुळे माझ्या आईने सन्मान केल्याची भावना आहे.’’ या वेळी लहान मुलांचे नृत्य, संगीत, नाट्यछटांचे सादरीकरण करण्यात आले.

Web Title: Continued support to those who do good work says Girish Bapat