ठेकेदार कंपनीवर दंडात्मक कारवाई करा - खासदार आढळराव पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

राजगुरुनगर - पुणे-नाशिक महामार्गावर, खेड-सिन्नरदरम्यान होत असलेल्या चौपदरीकरणाच्या कामातील, बाह्यवळणांच्या रखडलेल्या कामाला जबाबदार असणाऱ्या आयएल अँड एफएस ट्रान्स्पोर्टेशन नेटवर्क लिमिटेड या ठेकेदार कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच सदर कंपनी व संबंधित अधिकाऱ्यांना विनाविलंब काम सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केंद्रीय वाहतूक व दळणवळणमंत्री नितीन गडकरी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अध्यक्ष युधवीरसिंग मलिक यांच्याकडे पत्राद्वारे केली.

रस्त्याची कामे आयएल अँड एफएस कंपनी व त्यांचे उपठेकेदार यांच्यातील वादविवादांमुळे गेल्या दीड वर्षापासून रखडली आहेत. गेल्यावर्षी या बाह्यवळण रस्त्यांच्या भूमिपूजनप्रसंगी गडकरी यांनी, ऑक्‍टोबर २०१७ मध्ये बाह्यवळण कामाला सुरवात होईल, असे सांगितले होते. त्यानंतरही अनेक दिवस काम सुरू न झाल्याने आढळराव यांनी गडकरी यांची भेट घेतली असता, त्यांनी १५ मे रोजी काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. तरीही अद्याप काम न सुरू होणे दुर्दैवी आणि सरकारच्या, गडकरी यांच्या आणि पंतप्रधानांच्या प्रतिमेला धक्का पोचविणारे असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

‘कंपनीकडून महामार्ग प्राधिकरणाची दिशाभूल’
राजगुरुनगर, मंचर, कळंब, नारायणगाव व आळेफाटा या महत्त्वाच्या ठिकाणी दररोज तासनतास वाहतुकीचा खोळंबा होतो. रुग्णवाहिकेसारख्या अत्यावश्‍यक वाहनांनादेखील रुग्णांना वेळेवर दवाखान्यात पोचवणे शक्‍य होत नाही. त्यामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. एकाही शेतकऱ्याकडून रस्त्याच्या कामाला विरोध होत नसतानाही आयएल अँड एफएस कंपनीकडून जमिनी ताब्यात नसल्याची व कामाला शेतकऱ्यांचा विरोध असल्याची खोटी कारणे पुढे करून महामार्ग प्राधिकरणाची दिशाभूल करण्यात येत असल्याचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटले आहे.

Web Title: contractor company fine crime shivajirao adhalrao patil