
हिंदी भाषेचा प्रसार व प्रचार देश-विदेशात होण्यासाठी चित्रपट क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.
पुणे - हिंदी भाषेचा प्रसार व प्रचार देश-विदेशात होण्यासाठी चित्रपट क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त २१ फूट उंचीचे ‘नभ अभीप्सा’ शिल्प साकारले आहे. त्याचे अनावरण कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेचे संचालक भूपेंद्र कॅंथोला, दूरचित्रवाणी विभागाचे अधिष्ठाता राजेंद्र पाठक, चित्रपट विभागाचे अधिष्ठाता धीरज मेश्राम आदी उपस्थित होते.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
‘नभ अभीप्सा’ धातुकला शिल्प हे जुन्या व निर्जीव साहित्यांपासून सुंदर कलाकृती उभारणी केल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन करताना कोश्यारी म्हणाले, ‘‘दूरदर्शन व इतर माध्यमातून या सुंदर कलाकृतीचा प्रसार करा, ज्यामुळे विश्वातील लोक येथे ही कलाकृती बघण्यासाठी येतील. या संस्थेचे शतक महोत्सवी वर्ष साजरे करताना देशभरासह विश्वातील अनेक मान्यवर आले पाहिजेत.
खंडणी मागत व्यावसायिकांना केली मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल
कॅंथोला म्हणाले, ‘‘माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. चित्रपट शिक्षणाची पुणे ही काशी आहे. चित्रपट क्षेत्र हे कला व विज्ञान यांचा अद्भुत संगम आहे.’’
Video: अयोध्येतील राममंदिरासाठी राज्यपालांचं दगडूशेठ गणपतीला साकडं!
कोश्यारी यांनी सुरवातीला ऐतिहासिक प्रभात स्टुडिओमधील जुने व नवीन प्रकारचे कॅमेरे, लाइट तसेच चित्रपट निर्मिती विषयक दुर्मिळ साहित्यांची पाहणी केली. त्यांच्या हस्ते कला दिग्दर्शन विभागप्रमुख प्रसन्न जैन आणि कला निर्मिती विभागप्रमुख विक्रम वर्मा यांच्या संकल्पनेतून ‘नभ अभीप्सा’ हे शिल्प साकारल्याबद्दल सन्मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.
Edited By - Prashant Patil