पिंपरी पालिकेतील बेशिस्तीला आळा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

पिंपरी - महापालिकेच्या स्थापत्य, बांधकाम परवाना आणि नगररचना विभागात कार्यालयीन वेळेनंतर येणाऱ्या ठेकेदारांची संख्या लक्षणीय असते. याशिवाय जादा काम केल्याचे दाखवून या विभागातील काही अधिकारी व कर्मचारी ओव्हर टाइमचा पगारही घेतात. या बेशिस्तीला आळा घालण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कठोर पावले उचलण्यास सुरवात केली आहे.

कार्यालयीन वेळेनंतर महापालिका मुख्यालयात नागरिकांना प्रवेश देऊ नये, असे आदेशच त्यांनी सुरक्षा विभागांसह सर्वच विभागांना दिले आहेत. 
कार्यालयीन कामकाजाची वेळ संपुष्टात आल्यानंतरही स्थापत्य, नगररचना, बांधकाम परवाना या विभागांत नागरिक, ठेकेदार, बांधकाम व्यावसायिकांचा महापालिका भवनात मोठ्या प्रमाणावर राबता असल्याचे यापूर्वी अनेकदा उघडकीस आले आहे. इतर विभाग पावणेसहानंतर बंद झाल्यानंतर महापालिकेत शुकशुकाट होतो. मात्र, त्याचवेळी या विभागात अधिकारी, ठेकेदार, व्यावसायिकांच्या कामाला उधाण येते. ठेकेदारांमार्फत अधिकारी व कर्मचारी यांना बाहेरील हॉटेलमधून चहा, नाश्‍ता याची सोय केली जाते. ही बाब आयुक्‍तांच्या कानावर गेल्यानंतर आता त्यांनी शिस्तीचा बडगा उगारला आहे.

Web Title: control with discipline in pimpri municipal