मराठा समाजाने संयम बाळगावा - शेट्टी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

पुणे - सर्व पक्ष आणि संघटनांनी मागण्यांना पाठिंबा दिला आहे. लढा अंतिम टप्प्यात आला आहे, त्यामुळे मराठा समाजाने संयम बाळगावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी केले. 

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने शेट्टी यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी हे आवाहन केले. या वार्तालापात दूध आंदोलन, पक्षाची पुढील वाटचाल, मराठा, धनगर आरक्षण याबरोबरच आगामी निवडणुकीत पक्षाची काय भूमिका राहणार यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. 

मराठा समाजाने यापूर्वी आरक्षणाच्या मागणीसाठी 57 मोर्चे शांततेत काढले. जगभर त्याचे कौतुक झाले; परंतु सरकारने त्यांची दखल घेतली नाही, असे सांगून शेट्टी म्हणाले, ""चार दिवसांत दगडफेक सुरू झाल्यानंतर सरकारची पळापळ सुरू झाली. चळवळीतील कार्यकर्त्यांनी याचा काय अर्थ घ्यावयाचा. लाल फितीतील सरकारची यंत्रणाच हे करावयाला भाग पडते. या समाजामध्ये विश्‍वास निर्माण करण्यास हे सरकार कमी पडले.'' 

विचार न करता आश्‍वासने दिली. नागरिकांच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या. त्यातून हा गोंधळ निर्माण झाला आहे, असे सांगून शेट्टी म्हणाले, ""आर्थिक निकषांवर आरक्षण देणे अडचणीचे ठरेल. सहकारामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचे आरक्षण आहे; परंतु त्यांच्या जागी कोण येते, कशा गडबडी होतात. हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे कोणताही ठोस पर्याय असल्याशिवाय अशा पद्धतीने आरक्षण देणे योग्य राहणार नाही.'' 

भाजपबरोबर जाणार नाही 
सगळ्याच पक्षांना सध्या समान अंतरावर ठेवले आहे, असे सांगून शेट्टी म्हणाले, ""या आधीचे सरकार नाठाळ होते; परंतु एका टप्प्यानंतर ते बदल करावयास, चर्चा करण्यास तयार होत असे; परंतु सध्याचे सरकार म्हणजे जगातील सर्व सत्य आम्हाला माहीत आहे, अशा अविर्भावात आहे. ऐकून घेण्यास तयार नाही. त्यामुळे यापुढे कोणत्याही परिस्थितीत भाजपबरोबर जाणार नाही.'' 

Web Title: control of Maratha community says raju Shetty