अध्यक्षपदावरून पिंपरी महापालिकेत पुन्हा वादाची चिन्हे

अध्यक्षपदावरून पिंपरी महापालिकेत पुन्हा वादाची चिन्हे

पिंपरी - स्थायी समितीच्या अध्यक्ष पदावरून भाजपतील गटांमध्ये यंदा पुन्हा वाद उफाळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. संतोष लोंढे यांनाच स्थायी समितीचे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी महापौर राहुल जाधव आणि माजी महापौर नितीन काळजे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांमध्ये वाद होण्याची शक्‍यता आहे.

महापालिकेत दोन वर्षांपूर्वी भाजपची सत्ता आल्यानंतर पहिल्या दोन्ही वर्षांत स्थायी समितीचे अध्यक्षपद चिंचवडला मिळाले, तर दोन्ही वेळा महापौरपदी भोसरी मतदारसंघातील नगरसेवकांना मिळाले. जाधव म्हणाले, ‘‘भोसरीतील नगरसेवक लोंढे यांनाच स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळावे, अशी भोसरीतील आम्हा नगरसेवकांनी आग्रही मागणी आहे. त्यासाठी आमदार जगताप, लांडगे यांनाही भेटणार आहोत. सभागृह नेते एकनाथ पवार यांच्याकडे ही मागणी केली.’’ स्थायी समितीचे अध्यक्षपद गेल्या वर्षी ममता गायकवाड यांना मिळाले. तेव्हा अध्यक्षपद न मिळाल्याने राहुल जाधव, शीतल शिंदे यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. माजी महापौर काळजे यांनीही महापौर पदाचा राजीनामा जगताप यांच्याकडे दिला होता. आता शिंदे हेही स्थायी समितीचे सदस्य झाले असून, अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत.

जाधव म्हणाले, ‘‘लोंढे अध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करतील. भाजपचे दोन उमेदवार रिंगणात असले तरी चालतील.’’

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com