बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयातील घुबड पुण्याला पाठविण्यावरून वादंग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

पिंपरी (पुणे) : "चिंचवड-संभाजीनगर येथील बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयात उपचारासाठी आणलेले दुर्मिळ जातीचे घुबड कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात पाठविण्याचे कारण काय? यापूर्वी चौधरी प्राणिसंग्रहालयातून अजगर, मगर यांची तस्करी झालेली आहे. त्यामुळे हा प्रकार देखील अधिकारी, कर्मचारी आणि सर्पमित्रांच्या संगनमताने घडला आहे,'' असा आरोप माजी महापौर मंगला कदम यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला. 

कदम म्हणाल्या, "जखमी अवस्थेतील दुर्मिळ प्रजातीचे घुबड जागा नसल्याचे कारण देत प्राणीमित्राच्या माध्यमातून कात्रज येथील प्राणिसंग्रहालयात हलविण्यात आले. ते महापालिकेने न हलविता संबंधित प्राणीमित्राला वैयक्तिकरीत्या हलविण्यास सांगितले. प्राणिसंग्रहालयाचे नियम काटेकोर असताना हा प्रकार घडला आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून अभिरक्षक दीपक सावंत यांना निलंबित करावे. चौधरी प्राणिसंग्रहालयात हे घुबड ठेवले असते तर ते नागरिकांना पाहता आले असते.'' 

सावंत म्हणाले, "शाहीद शेख या प्राणिमित्राला देहू-तळेगाव परिसरात हे घुबड सापडले होते. मांजामध्ये पंख सापडल्याने त्याचा एक पंख तुटला होता. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याला चौधरी प्राणिसंग्रहालयात उपचारासाठी आणले होता. दुर्मिळ प्रजातीचे असलेले हे मत्स्य घुबड खूप जास्त जखमी झाले होते. त्याच्यावर उपचार करण्यासाठी प्राणिसंग्रहालयात पुरेशी व्यवस्था नव्हती. पिंजऱ्यांची अनुपलब्धता, प्राण्यांच्या नियमावलीत नसलेला समावेश, वाहन व्यवस्थेचा अभाव आदी कारणांमुळे त्यालाच ते घुबड कात्रज प्राणिसंग्रहालयात घेऊन जाण्यास सांगितले.'' 

"संबंधित घुबड बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाच्या रेकॉर्डवर तपासणीसाठी नव्हते. त्याशिवाय, प्राणिसंग्रहालयात अपंग प्राणी ठेवण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे त्याला कात्रजच्या प्राणिसंग्रहालयात हलविण्याचा निर्णय घेतला.'' 
- डॉ. प्रवीण आष्टीकर

Web Title: controversy on owl transfer to pune in bahinabai chaoudhari zoo