येरवडा महिला कारागृहात 'सोलर कुकर'वर स्वयंपाक

येरवडा महिला कारागृहात 'सोलर कुकर'वर स्वयंपाक

येरवडा : येरवडा महिला मध्यवर्ती कारागृहात प्रथमच कैद्यांच्या स्वयंपाकासाठी "सोलर स्टीम कुकिंग सिस्टीम' यंत्रणा उभारली आहे. स्वयंपाकासाठी भात, डाळ, पालेभाज्या शिजविण्याचे काम काही मिनिटांत होत आहे. त्यामुळे दर महिन्याला तीस घरगुती सिलिंडरची बचत होत असल्याने इंधन आणि वेळेची बचत होत आहे. 

केंद्र सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाने जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय अभियानअंतर्गत 22 लाख रुपये खर्च करून ही यंत्रणा बसविली आहे. कारागृह प्रशासनाने "महाऊर्जा'च्या मार्गदर्शनाखाली महिला कारागृहामागील मोकळ्या जागेत सोलर यंत्रणा बसविली. तर नागपूर येथील ग्रीन एनर्जी संस्थेकडून "सोलर स्टीम कुकर' यंत्रणा बसविली. 

या संस्थेकडून कारागृहातील पाच महिला कर्मचाऱ्यांना ही यंत्रणा चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सोलर सिस्टीममुळे कैद्यांना स्नानासाठी लागणारे गरम पाणी, स्वयंपाकासाठी भात, डाळ व पालेभाज्या शिजविण्याचे आणि दूध तापविण्याचे काम या यंत्रणेद्वारे होऊ लागले आहे. त्यामुळे वेळ व पैशाची बचत होत आहे. 

केंद्र सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाने महिला कारागृहात सोलर स्टीम कुकर यंत्रणा बसविण्यासाठी बावीस लाख पस्तीस हजारांचा निधी मंजूर केला. त्यापैकी सोळा लाखांचे सोलर सिस्टीम बसविण्यात आले. प्रशासनाकडून उर्वरित निधीचे सोलर यंत्रणा बसविले जाणार आहे. 

- यू. टी. पवार, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com