समर सीझनमध्ये कूल लुक

समर सीझनमध्ये कूल लुक

पुणे - समर सीझन आलाय... तर हटके फॅशन हवीच. तरुणाईकडून या सीझनमध्ये नवनव्या फॅशनचा फंडा आजमावला जात आहे. कुल लुक आणि हटके स्टाइलच्या जोडीला उन्हाळ्यात कंफर्टेबल असावे, असेच कपडे परिधान करण्यावर तरुण-तरुणींचा भर असून, यंदाही कॉटनमध्ये फिक्‍या रंगाचे आणि प्रिंटेड कपड्यांचा ट्रेंड आला आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सुटसुटीत कपड्यांच्या फॅशनचा बोलबाला आहे. लाइट कलर प्लस बोल्ड प्रिंटचे झक्कास कॉम्बिनेशन तरुणाईला आकर्षित करीत आहे. 

सध्या उन्हाळ्याचा कडाका वाढला आहे. त्यामुळे कपड्यांमध्ये कम्फर्ट यावा, याकडे सर्वांचे लक्ष असून, क्‍लासिक आणि वेगळा लुक देणाऱ्या फॅशनची चलती आहे. टी-शर्टपासून र्थी-फोर्थपर्यंत... पल्लाझोपासून ते स्कार्फपर्यंत प्रत्येक कपड्यात एक वेगळी स्टाइल जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुती कपड्यांना मागणी आहेच. त्याशिवाय कॉटन आणि होजिअरीचे कपडे वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याशिवाय लिनन आणि जॉर्जेटच्या कपड्यांचीही फॅशन आहे. पातळ कॉटनचे रंगीबेरंगी कपडेही आकर्षित करीत असून, उन्हाळ्यात फिक्कट रंगांना पसंती मिळत आहे. प्लेन कापड आणि त्यावर फिकट रंगाचं प्रिंटवर्क असाही ट्रेंड आहे. त्याशिवाय पांढऱ्या रंगातील कपड्यांचे विविध प्रकारही बाजारात दिसून येतील. यंदा पिवळ्या रंगासोबतच फिक्कट जांभळा, निळा, गुलाबी अशा रंगांचे कपडे खरेदी केले जात आहेत. 

स्लिव्हलेस शॉर्ट कुर्त्याबरोबरच गुडघ्यापर्यंतच्या स्कर्टसह कॉटन-होजिअरीमधील पांढऱ्या रंगाच्या ट्राउझर्सचा कॅज्युअल लुक लोकप्रिय होत आहे. फॉर्मल कपड्यांमध्ये फॉर्मल शर्ट, स्ट्रेट स्कर्टलाही सध्या चांगली मागणी आहे. विशेष म्हणजे पॅंट आणि स्कर्ट फिकट रंगाचे, तर शर्ट आणि टॉप प्रिंटेड असण्याचा ट्रेंड असल्याचे दिसतो. उन्हाळ्यात थ्री-फोर्थसह खास गुडघ्यापर्यंतचे फिक्कट रंगांचे कपडे सर्व वयोगटांतील व्यक्ती वापरताना दिसतात. यात कॉटन, शिफॉन, लेस फॅब्रिक अशा अनेक प्रकारच्या कपड्यांचा वापर केला जात आहे. महिलांमध्ये जॉर्जेट किंवा चिकनच्या कापडावर एम्ब्रॉयडरी करून वापरण्याची फॅशन आहे. क्रॉप पॅन्ट्‌स, कफ्तान, पलाझ्झो, कॉटन जम्पसुट्‌स, लाँग शर्ट आणि वनपीस ड्रेसेस खासकरून तरुणी वापरतात. उन्हाळ्यात कमीत कमी ॲक्‍सेसरीज वापरण्यावर तरुणींचा भर असतो. ज्यूट, टेराकोटापासून बनविलेले इअरिंग्ज, पेंडट्‌स याच्यासह शूजपेक्षा चप्पल्स आणि सॅंडल्स वापरले जात आहेत. कॉटन स्कार्फलाही पसंती मिळत आहे. समर सीझनमध्ये सनग्लासेस अधिक भाव खाऊन जातात. मोठ्या आकाराची हॅट आणि टोप्याही तरुणाई वापरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com