अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाची पुण्याच्या वैदेहीला शिष्यवृत्ती 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

पुणे - पुण्याच्या वैदेही रेड्डीला अमेरिकेतील प्रतिष्ठित (आयव्ही लीग युनिव्हर्सिटी) कॉर्नेल विद्यापीठाची पावणेदोन कोटी रुपयांची (74 हजार यूएसए डॉलर) शिष्यवृत्ती "बॅचलर ऑफ फाइन आर्टस्‌' (बीएफए) या पदवी अभ्यासक्रमासाठी मिळाली आहे. कॉर्नेल विद्यापीठाच्या 153 वर्षांच्या इतिहासात वैदेही रेड्डी ही फाइन आर्ट या विद्याशाखेत पूर्ण शिष्यवृत्ती मिळवणारी पहिली भारतीय विद्यार्थिनी बनली आहे. अलीकडेच वैदेहीने बारावीची परीक्षा दिली आहे. 

येत्या ऑगस्ट महिन्यापासून या शिष्यवृत्तीअंतर्गत वैदेही चार वर्षांच्या "बॅचलर ऑफ फाइन आर्टस्‌' या अभ्यासक्रमाच्या शिक्षणास सुरवात करेल. या पूर्वीही वैदेहीला आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 2014 मध्ये वैदेहीने "गुगल डूडल' ही स्पर्धा जिंकली होती आणि 2016 मध्ये गुगलच्याच "वेब रेंजर' स्पर्धेतही वैदेही विजेती ठरली होती. त्या वेळी तिला "गुगल'च्या अमेरिकेतील मुख्यालयात जाण्याची संधीही मिळाली होती. चीन सरकारतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित "तियानजिन' आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत वैदेहीने यंदा प्रथम क्रमांकाचा "प्लॅटिनम ऍवॉर्ड' मिळवला आहे. वैदेहीचे वडील भारतीय सैन्यात कार्यरत आहेत. तर आई शिक्षण क्षेत्रात काम करते. 

ही शिष्यवृत्ती मिळाल्याचा आनंद आहे. तुम्हाला आवडेल तीच गोष्ट करा. आई-वडील तुम्हाला डॉक्‍टर, इंजिनिअर होण्याची गळ घालत असतील आणि तुम्हाला कला, खेळ किंवा नृत्याची आवड असेल तर ते करा. मला आई-वडिलांनी असे बंधन घातले नव्हते. त्यामुळेच कला क्षेत्रात मला उत्तम संधी मिळाली. 
- वैदेही रेड्डी 

Web Title: Cornell University of America Scholarship Vaidehi Reddy