पुणेकर भवानी पेठ परिसरात आता आहेत `एवढे` कोरोना बाधित

Corona l0.jpg
Corona l0.jpg

कॅन्टोन्मेंट (पुणे) : पुणे महानगरपालिका भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत प्रभागाच्या प्रत्येक भागातील कोरोनासंबंधित आकडेवारी जाहीर करण्यात आली. 26 मार्च ते 4 जून पर्यंत असलेली ही आकडेवारी आहे. या क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत पर्यंत प्रभाग क्र.18 मध्ये आतापर्यंत एकूण 371 संख्या असलेल्या सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या केसेस आढळून आल्या आहेत.  तर बरे झालेले रुग्ण एकूण 262 आहे. तर कोरोनाने मृत्यू पावलेल्यांची सर्वाधिक संख्या  प्रभाग 19 मध्ये असून एकूण 24 जणांचा मृत्यू या प्रभागात झाला आहे. तसेच सध्यपरिस्थितीत सर्वाधिक पॉझिटीव्ह रुग्णांचा  आकडा असलेला प्रभाग क्र. 17 असून या प्रभागात सध्या एकूण 120 रुग्ण हे पॉझिटीव्ह आहेत.

या संबंधित विभागीय वैद्यकीय अधिकारी  डॉ. राजेश दिघे यांनी सांगितले की, अनेक भागात 70 ते 80 टक्के लोकांमध्ये लक्षणे दिसत नाही. मात्र, तपासणी दरम्यान अनेक जण कोरोनाबाधित असल्याचे चित्र समोर आले. विशेषतः दाट लोकवस्तीच्या भागामध्ये अजूनही अनेक ठिकाणी मास्कचा वापर केला जात नाही. अनेकजण तर चुकीच्या पद्धतीने मास्क लावतात. यामध्ये तोंडावरचा मास्क काढून गळ्यात घालणे व अर्धा ओठांवर लावून त्याला सतत हाताळणे असे प्रकार सुरु आहे. त्याच बरोबर सोशल डिस्टन्स राखणे हे फार महत्वाचे आहे.

विशेषतः  भाजी विक्रेते, फेरीवाले यांच्याकडून अधिक संक्रमण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाज्या फळे ही स्वच्छ धुतली पाहिजे. वारंवार हात धुवून जवळपास हाताळणाऱ्या वस्तू सॅनिटाईज केल्या पाहिजे. कोरोनामुळे बहुसंख्य नागरिकांच्या जीवाला धोका होत नसला तरी मधुमेह, रक्तदाब, किडनी सारखे आजार नियंत्रणात न ठेवल्यामुळे बाधितांच्या जीवाला धोका संभवू शकतो. त्यामुळे या आजारांवर वेळोवेळी उपचार घेणं महत्वाचे आहे. कासेवाडी, लोहियानगर, गंज पेठ सारख्या दाट लोकवस्तीचा भाग सध्या आटोक्यात आणला गेला आहे. अनेकांनी कोरोनासंबंधित असलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून स्वतः व इतरांची काळजी घेऊन शासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी डॉ. दिघे यांनी नागरिकांना केले आहे.

खालील देण्यात आलेली प्रभागातील सविस्तर आकडेवारी:-

सध्या प्रभाग 17 मधील एकूण 214 केसेस पैकी 76 रुग्ण हे बरे झाले आहेत. तर 18 जण मृत्यू पावले असून सध्या 120 जण कोरोना पॉझिटीव्ह आहेत.​

नाना पेठ येथील एकूण 43 केसेस पैकी 27 जण बरे झाले. 4 जणांचा मृत्यू तर सध्या 12 रुग्ण हे पॉझिटीव्ह आहेत.

रस्ता पेठ येथील एकूण 40 केसेस पैकी 28 रुग्ण हे बरे झाले. 4 जणांचा मृत्यू झाला असून सध्या 8 रुग्ण हे पॉझिटीव्ह आहेत.

गणेश पेठ येथील एकूण 36 केसेस पैकी 12 रुग्ण हे बरे झाले. 6 जणांचा मृत्यू झाला असून सध्या 18 जण पॉझिटीव्ह आहेत.

नाडे  गल्ली येथील एकूण 21 केसेस पैकी संपूर्ण 21 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहे.

चामडे गल्ली येथे एकूण 15 केसेस पैकी 2 रुग्ण हे बरे झाले असून सध्या 13 पॉझिटीव्ह रुग्ण आहेत.

बधवार पेठ येथे एकूण 29 केसेस पैकी 4 जण हे बरे झाले आहेत. सध्या 25 रुग्ण पॉझिटीव्ह आहेत.

रेड लाईट एरिया येथील एकूण 15 केसेस पॉझिटीव्ह आहेत.

रविवार पेठ येथे एकूण 13 केसेस पैकी 2 रुग्ण हे बरे झाले. 4 जणांचा मृत्यू झाला असून  सध्या 7 रुग्ण हे पॉसिटीव्ह आहेत. 

कुंभारवाडा येथे एकूण 2 केसेस पैकी 1 रुग्ण बरा झाला आहे. सध्या एक रुग्ण पॉझिटीव्ह आहे.

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


प्रभाग 18 येथे एकूण 371 केसेस पैकी 262 रुग्ण हे बरे झाले आहेत. तर 20 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून सध्या 89 रुग्ण हे पॉसिटीव्ह आहेत.
खालील देण्यात आलेली  प्रभागातील सविस्तर आकडेवारी:-

 
काची आळी एकूण केसेस 18 पैकी 12 रुग्ण बरे झालेत. 2 मृत्यू तर सध्या 4 पॉझिटीव्ह आहेत.

शुक्रवार पेठ येथील एकूण केसेस 2 पैकी 1 रुग्ण बरा झाला असून एकाचा मृत्यू झाला आहे.


गुरुवार पेठ एकूण 4 केसेस पैकी सर्व बरे झाले आहेत. सध्या रुग्ण संख्या शून्य आहेत. 

रविवार पेठ येथील एकूण 7 केसेस पैकी 6 रुग्ण बरे झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. सध्या एकही रुग्ण पॉझिटीव्ह नाही.

खडकमाळ आळी येथे एकूण 8 केसेस पैकी सर्व रुग्ण बरे झाले आहेत. सध्या रुग्ण संख्या शून्य आहेत.

घोरपडे पेठ येथील एकूण 24 केसेस पैकी 8 रुग्ण बरे झाले आहेत तर सध्या 16 पॉझिटीव्ह आहे.

स्वारगेट पोलीस लाईन येथील एकूण 3 केसेस पैकी सर्व रुग्ण बरे झाले आहेत.सध्या एकही पॉझिटीव्ह रुग्ण नाही.

353 घोरपडे पेठ संपूर्ण परिसरात एकूण 46 केसेस पैकी 32 रुग्ण बरे झाले आहेत. एकाचा मृत्यू झाला असून सध्या 13 रुग्ण हे पॉझिटीव्ह आहेत.


343 घोरपडे पेठ संपूर्ण परिसरात एकूण 52 केसेस पैकी 36 रुग्ण हे बरे झाले. एकाचा मृत्यू तर सध्या 15 पॉझिटीव्ह रुग्ण आहेत.

घोरपडे पेठ मोमिनपुरा कब्रस्तान लगत संपूर्ण परिसरात एकूण 39 केसेस पैकी 28 रुग्ण बरे झाले. एकाचा मृत्यू तर सध्या 7 पॉझिटीव्ह आहेत.

घोरपड़े पेठ शाळा क्रमांक 13 लगत संपूर्ण परिसरात 
एकूण 42 केसेस पैकी 33 रुग्ण हे बरे झाले. एकाचा मृत्यू तर सध्या 12 पॉझिटीव्ह रुग्ण आहेत.

314 घोरपडे पेठ संपूर्ण परिसरात एकूण 26 केसेस पैकी 18 रुग्ण बरे झाले. एकाचा मृत्यू तर सध्या 6 रुग्ण हे पॉझिटीव्ह आहे.

365 घोरपडे पेठ संपूर्ण परिसरात एकूण 42 केसेस पैकी 36 रुग्ण हे बरे झाले. एकाचा मृत्यू तर सध्या 5 पॉझिटीव्ह आहेत.


180 घोरपडे पेठ स्वारगेट लगतचा संपूर्ण परिसरात एकूण 10 केसेस पैकी 1 रुग्ण बरा झाला. एकाचा मृत्यू तर सध्या 8 पॉझिटीव्ह आहेत.

633 गंज पेठ महात्मा फुले पेठ येथील एकूण 9 केसेस पैकी, 7 रुग्ण हे बरे झाले. 2 मृत्यू तर रुग्ण संख्या शून्य आहे.

 गंज पेठ मासे आळी येथे एकूण 24 केसेस पैकी 17 रुग्ण बरे झाले. 4 जणांचा मृत्यू तर सध्या 3 पॉझिटीव्ह आहेत.


पुणे म.न.पा. वसाहत क्रमांक 6 येथे एकूण 12 केसेस पैकी 11 जन बरे झाले. एकाचा मृत्यू तर सध्या रुग्ण संख्या शून्य आहे.

महात्मा फुले स्मारक गंज पेठ संपूर्ण परिसरात एकूण 3 केसेस पैकी 1 रुग्ण बरा झाला. 2 जणांचा मृत्यू तर सध्या रुग्ण संख्या शून्य आहे.

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रभाग 19 येथे एकूण 249 केसेस पैकी 189 रुग्ण हे बरे झालेत. तर आतापर्यत 24 जणांचा मृत्यू झाला असून एकूण 36 रुग्ण हे पॉझिटीव्ह आहेत.

कासेवाडी एकूण 32, बरे झालेले रुग्ण 10, मृत्यू 11, तर पॉझिटीव्ह रुग्ण  11 आहेत.

 गुरुनानक नगर येथे एकूण केसेस 4 पॉसिटीव्ह, शंकर शेठ येथे 2 पॉझिटीव्ह आहेत.

हरकानगर येथे 9 पॉसिटीव्ह, यापैकी 8 रुग्ण बरे झाले व एकाचा मृत्यू झाला. सध्या रुग्णसंख्या शून्य आहे.

512 भवानी पेठ येथे एकूण केसेस 6, बरे झालेले रुग्ण 4, मृत्यू 2 झाले आहेत.सध्या रुग्ण संख्या नाही.

जुना मोटार स्टॅन्ड येथे एकूण केसेस 4 पैकी  बरे झालेले रुग्ण 3 व एकाचा मृत्यू झाला असून सध्या एकही रुग्ण पॉझिटीव्ह नाही.

चुडामण तालीम येथे एकून केसेस 2 पैकी बरे झालेले रुग्ण 1, व एकाचा मृत्यू, झाला असून सध्या एकही रुग्ण पॉझिटीव्ह नाही.

लोहियानगर गल्ली क्रमांक १ ते ५ येथे एकूण 53 केसेस, बरे झालेले रुग्ण 35, मृत्यू 7, सध्या पॉझिटीव्ह रुग्ण 11 आहेत.

एकबोटे कॉलनी येथे एकूण 5 केसेस, बरे झालेले रुग्ण 1, सध्या पॉझिटीव्ह 4 आहे.

इनामकेमळा परिसर येथे एकूण असलेले 24 केसेस पूर्ण बरे झाले असून  सध्या रुग्णांची शून्य आहे.

824/830 भवानी पेठ भवानी माता मंदिर जवळील संपूर्ण परिसर येथे एकूण 38 केसेस, बरे झालेले रुग्ण 33, एकाचा मृत्यू तर सध्या 4 पॉझिटीव्ह आहे.

377/78 भवानी पेठ बालाजी मंदिर परिसर येथे एकूण 32 केसेस हे पूर्ण बरे झाले असून सध्या शून्य पॉझिटीव्ह आहे.

ए.डी. कैम्प चौक ते भारत सिनेमा परिसर येथे एकूण 26 केसेस पैकी पूर्ण रुग्ण बरे झाले आहे.सध्या पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा शून्य आहे.

817 भवानी पेठ येथे एकूण 12 केसेस बरे झाले असून सध्या पॉझिटीव्ह आकडा शून्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com